शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

पालघर, वसई, वाडा, तलासरीत दिग्गजांना धोबीपछाड, बहुजन विकास आघाडीला पु्न्हा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 5:56 AM

पालघर जिल्ह्यातील वाडा, वसई, पालघर व तलासरीतील ग्रामपंचायतीच्या मंगळवारी लागलेल्या निकालात प्रस्थापित पक्षांना धोबीपछाड बसला.

वसई/पालघर/वाडा/तलासरी :    पालघर जिल्ह्यातील वाडा, वसई, पालघर व तलासरीतील ग्रामपंचायतीच्या  मंगळवारी लागलेल्या निकालात प्रस्थापित पक्षांना धक्का बसला.  वाडा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत बहुतांशी ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनेलने बाजी मारली आहे. वसई तालुक्यातील दुसºया टप्प्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला पु्न्हा धक्का बसला. पालघर मध्ये सातपाटी ‘श्रॉफ मैदाना’ बाबत खदखदत असलेला संताप मतदारांनी निवडणुकीतून व्यक्त करीत एकता विकास मंच च्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देत सेना-काँग्रेस च्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला. तर तलासरीतील कोदाड ग्रामपंचातीची सत्ता भाजपाने राखली आहे. वसई तालुक्यातील दुस-या टप्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला पु्न्हा धक्का बसला. सातपैकी चार ठिकाणी विरोधकांचे सरपंच निवडून आले. बहुजनचे तीन सरपंच निवडून आले असले तरी त्यातील दोन सरपंचांना निसटता विजय मिळाला आहे.गेल्या महिन्यात झालेल्या आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विरोधकांनी पाच ग्रामपंचायती जिंकून बहुजन विकास आघाडीला धक्का दिला होता.कळंब ग्रामपंचायतीत गेली ४० वर्षे भाजपाची सत्ता होती. पण, यावेळी भाजपविरोधात काँग्रेस, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीने आपापसात समझौता करून उमेदवार मैदानात उतरवले होते. त्यामुळे भाजपला ग्रामपंचायत गमवावी लागली. १३ पैकी ५ जागा स्वबळावर लढत असलेल्या भाजपाने जिंकल्या. तर सरपंचपद ंिजंकणाºया आघाडीला अवघ्या तीन जागा जिंकता आल्या. शिवसेनेने दोन आणि काँग्रेसने तीन जागा जिंकल्या.गेल्या अ़नेक वर्षांपासून भाजपची आणि भोईर कुटुंबाची सत्ता असलेल्या पाणजू ग्रामपंचायत भाजप आणि भोईर कुटुंबियांनी पुन्हा जिंकली. भाजपाचे आशिष भोईर सरपंचपदावर तिसºयांदा निवडून आले. ७ पैकी सहा जागा भाजपाने तर एक जागा शिवसेनेने ंिजंकली. बहुजन विकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही.पारोळ ग्रामपंचायतीत विरोधकांच्या एकजुटीने बहुजन विकास आघाडीची सत्ता उलथून टाकली. सत्ताधारी आघाडील नऊपैकी अवघ्या दोनच जागा जिंकता आल्या. तर शिवसेना, काँग्रेस व श्रमजीवीच्या परिवर्तन पॅनलने सात जागा जिंकल्या. सरपंचपदी याच पॅनलचे नरेश तुंबडा सरपंचपदी निवडून आले. तर पॅनलमधून निवडणुक लढवीत असलेले काँग्रेसचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राम पाटील आपल्या पत्नीसह विजयी झाले.करंजोण ग्रामपंचायतीत सात पैकी दोन जागा जिंकणाºया शिवसेनेचा सरपंच निवडून आला. शिवसेनेचे प्रकाश सापटे सरपंचपदी निवडून आले. याठिकाणी श्रमजीवीची सत्ता होती. श्रमजीवीला दोन आणि बहुजन विकास आघाडीला तीन जागा मिळाल्या. मालजीपाडा ग्रामपंचायतीत श्रमजीवीची सत्ता होती. मात्र, सत्ताधाºयांच्या भ्रष्टाचाराने याठिकाणी परिवर्तन केले. बहुजन विकास आघाडीने सातपैकी चार जागा जिंकल्या. त्याचबरोबर सरपंचपदी बहुजनच्या सरीता पागी निवडून आल्या. जनआंदोलनाला तीन जागा जिंकता आल्या. मावळते सरपंत सतीश म्हात्रे अवघ्या एका मताने पराभूत झाले. तिल्हेर ग्रामपंचायत जनआंदोलनने पुन्हा राखली. ११ पेकी ६ जागा आणि सरपंचपद जनआंदोलनाने जिंकले. तर बविआला ५ पाच जागा जिंकता आल्या.नागले ग्रामपंचायतीत जनआंदोलाची सत्ता होती. मात्र, ९ पैकी सहा जागा जिंकणाºया जनआंदोलनाला सरपंचपदाला मुकावे लागले.सातपाटीच्या निवडणूकीमध्ये ‘श्रॉफ मैदाना’ बाबतची खदखद मतदारांनी मतदानातून केली व्यक्त पालघर : सातपाटी ‘श्रॉफ मैदाना’ बाबत खदखदत असलेला संताप मतदारांनी निवडणुकीतून व्यक्त करीत एकता विकास मंच च्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देत सेना-काँग्रेस च्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला. तर सरपंच पदाच्या निवडणुकीतही एकता मंचच्या अरविंद पाटील ह्यांनी आरपीआय चे तालुकाध्यक्ष अहमद (बाबू) भिमानी ह्यांचा तब्बल ५ हजार ८२ मताच्या फरकाने धुव्वा उडवीत ग्रामपंचायतीवर विजय मिळविला. सातपाटी गावाच्या विकासा साठी सर्व पक्षीय पदाधिकाºयांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाला श्राफ मैदानाच्या अंतर्गत गटातील वादाची झळ लागली आणि सर्वानुमताने ठरलेला साखरपुडा मोडला गेला. शिवसेना आणि काँग्रेस च्या काही पदाधिकार्यांची बैठक पालघर मधील सेनेचे राजेश सत्रा ह्यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.त्या बैठकीत काँग्रेस-सेनेने एकत्र पणे विकास मंचाच्या विरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा केली. ह्यावेळी तात्काळ श्रॉफ मैदानाबाबतचे सर्व पुरावे गावासमोर सादर करा. अश्या आशयाचे बॅनर सेनेचे माजी उपसभापती भुवनेश्वर मेहेर आणि काँग्रेसचे धनंजय मेहेर ह्यांनी गावात लावले. ह्याचा मोठा फटका ह्या निवडणुकीत सेनेला बसला.आणि त्यांचे अक्षरश: पानिपत झाले. आज आर्यन शाळे मध्ये १७ जागा पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या नंतर उर्विरत १३ जागा व सरपंच पदाच्या झालेल्या मतमोजणी दरम्यान सरपंच पदासाठी सातपाटी विकास एकता मंच चे उमेदवार अरविंद पाटील ह्यांना ६ हजार तर रिपाई पक्षाचे अहमद भिमानी ह्यांना अवघी ९१८ मते मिळाली. प्रभाग १ - मध्ये एकता मंच च्या भारत देव (७५२ मते) यांनी काँग्रेस -सेनेच्या अजय सामरे (१६४) ह्यांचा तर प्रभाग २ मध्ये रत्नाकर मेहेर (५५०) ह्यांनी मयूर पागधरे (२४३) ह्यांचा पराभव केला. प्रभाग ३ मध्ये एकता मंचच्या पंकज म्हात्रे (११०७) ह्यांनी काँग्रेस-सेनेच्या विश्वास पाटील (४६५) ह्यांचा पराभव केला.अंकिता मेहेर (११८९) ह्यांनी ज्योत्स्ना पाटील (३६३) ह्यांचा तर ज्योती म्हात्रे (१२४४) ह्यांनी प्राजक्ता पाटील (२७७) ह्यांचा पराभव केला.प्रभाग ४ मध्ये एकता मंच च्या सुमेध चौधरी (८२९ मते) ह्यांनी सेनेचे युवाध्यक्ष हिमांशू निजप (५८७) ह्यांचा पराभव केला. तर पूनम चौधरी (८८३) ह्यांनी वैशाली तरे (५१६) ह्यांचा पराभव केला.प्रभाग ५ मध्ये एकता मंचच्या कांचन पाटील (६१८) ह्यांनी काँग्रेस सेनेचे महेश म्हात्रे (१५४) ह्यांचा पराभव केला.वैभव पाटील (५१३) ह्यांनी सेनेचे शाखाप्रमुख राजू पागधरे (२५९) ह्यांचा तर अश्विनी तरे (५८५) ह्यांनी प्रज्ञा तर े(१७९) हीच पराभव केला.प्रभाग ६ मध्ये काँग्रेस सेनेचे उमेदवार अनिल मोरे (९४८) ह्यांनी एकता मंचच्या उमेश माळी (३५१) ह्यांचा,विद्या माळी (९९८) ह्यांनी एकता मंचाच्या हर्षदा माळी (२९९) तर अपक्ष असलेल्या जुहूर शेख (६५०) ह्यांनी काँग्रेस-सेनेचे परवेझ शेख (४१९)व अल्ताफ शेख (२३०) ह्यांचा पराभव केला.कोदाड ग्रामपंचायत भाजपने राखली; महेश थोरात यांची सरपंचपदी निवड तलासरी : तालुक्यातील कोदाड ग्रामपंचायत सदस्यत्व व जनतेतून थेट सरपंच निवडीच्या निवडणूक सोमवारी पार पाडल्या होत्या. तलासरी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात निवडणूक मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरवात करण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात आला. कोदाड ग्रामपंचायत निवडणुकी साठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. माकपाने तर या निवडणुकीत उमेदवारच उभे केले नाहीत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चुरस होती. पण घोडे बाजारात भाजपने बाजी मारल्याने गेली २५ वर्षांपासून एक हाती सत्ता राखलेल्या भाजपाने पुन्हा सत्ता काबुत राखण्यात यश मिळवले आहे. तर थेट जनतेतून सरपंच पदाची माळ महेश जीवन थोरात यांच्या गळ्यात पडली आहे.कोदाड ग्रामपंचायती मध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ६ उमेदवार आणि १ सरपंच उमेदवार विजयी झाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ३ उमेदवार निवडून आले आहेत. सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने मतदारांमध्ये निवडणुकीच्या दिवशी उत्साह दिसत होता. मतदानाच्या दिवशी ९३ टक्के मतदान झाले होते. कोदाड ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता कायम ठेवायची असल्याने आमदार पास्कल धनारे यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष विनोद मेढा, लक्ष्मण वरखंडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती भानुदास भोये, सदस्य सुरेंद्र निकुंभ, जि. सदस्य गीता धामोडे यांनी कंबर कसली होती.कार्यकर्त्यांच्या सहकार्याला आणि मेहनतीला यश येऊन भाजपला कोदाड ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा कायम राखण्यात यश मिळाले. कोदाड ग्रामपंचायतीमध्ये विजयी उमेदवारांमध्ये गंगू नरेश चव्हाण, मंजुळा विनोद पवार, निलेश रामल पवार, रेखा चंदू थोरात, संदीप सखाराम चौरे, मधु कांशीराम पवार, रंजना सतू सांबर, संगीत सीताराम सांबर, परशुराम बापू थोरात हे सदस्य म्हणून तर महेश जीवन थोरात हे सरपंच पदासाठी निवडूण आले.वाड्यात भाजपने तीन तर शिवसेनेने दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्यावाडा : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निकालात ग्रामविकास पॅनेलने बाजी मारल्याचे दिसत आहे. भाजपकडे तीन तर शिवसेनेने दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. प्रतिष्ठेची चिंचघर ही ग्रामपंचायत भाजपाने ताब्यात घेतली असून दहापैकी सात जागांवर उमेदवार निवडून आणले.येथे भाजपा विरोधात शिवसेना अशी थेट लढत झाली होती. यात शिवसेनेला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चिंचघर पाडा येथील प्रभाग क्र मांक एकमध्ये लोक स्वराज्य समृद्धी पनेलचा एक उमेदवार निवडून आला आहे तर दोन जागांवर

टॅग्स :ElectionनिवडणूकVasai Virarवसई विरार