पालघरमध्ये टॉवर हटाव सुरू
By Admin | Updated: March 15, 2016 01:00 IST2016-03-15T01:00:30+5:302016-03-15T01:00:30+5:30
पालघर शहरातील रस्ते रूंदीकरणासह स्थानिकांच्या रहदारीस अडचणीचे ठरू पाहणाऱ्या व बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेले टॉवर हटविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने आज प्रारंभ

पालघरमध्ये टॉवर हटाव सुरू
पालघर : पालघर शहरातील रस्ते रूंदीकरणासह स्थानिकांच्या रहदारीस अडचणीचे ठरू पाहणाऱ्या व बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेले टॉवर हटविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने आज प्रारंभ केला. या टॉवरला बहुजन विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी विरोध दर्शविला होता.
पालघर जिल्हा निर्मितीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या वाहनाची व नागरीकांमध्ये मोठी वाढ झाल्याने पालघर शहरातील वाहतुकीची कोंडी प्रशासनाची डोकेदुखी ठरू लागली होती. त्यामुळे पालघर नगरपरिषदेने शहरातील रस्ते रूंदीकरण यामध्ये दुभाजक टाकण्याचे काम हाती घेतले होते. हे रूंदीकरण करताना रूंदीकरणाच्या आड येणारी दुकाने, गाळे, घरे, संरक्षक भिंती हटविण्याचे काम हाती घेतल्यानंतर आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसण्याच्या दृष्टीने भविष्यात सोयीसुविधा निर्माण होतील या अपेक्षेने नागरीकांनी आपली घरे, दुकाने, तोडण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते प्रशस्त बनले होते. अशावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरीकांना चालण्यासाठी उभारलेल्या फुटपाथला लागुनच मे स्काय अॅडव्हरटायजींग एजन्सी, गोरेगाव मुंबई यांना ४० ठिकाणी टॉवर उभारण्याची परवानगी सन २०१३ साली दिली होती व काही शर्ती अटीघालून ३ लाख २६ हजार रू. ची आगाऊ रक्कमही स्वीकारली होती. मे स्काय एजन्सीने पालघर नगरपरिषदेची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या टॉवर उभारणीचे काम हाती घेतल्यानंतर हे टॉवर नागरीकांच्या दृष्टीने धोकादायक व अडचणीचे ठरू पाहत होते.