शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घरकुलाचे मंजुरी प्रमाणपत्र आणण्यासाठी गेला आणि घरी परतलाच नाही, आता सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 21:05 IST

Palghar News: भोपोली येथून आपले घरकुल मंजूर झाल्याने त्याचे मंजुरी प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या नारायण रामचंद्र राहणे (वय37 वर्ष) या पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील  झुडपात मिळून आला.

- हितेन नाईकपालघर -  भोपोली येथून आपले घरकुल मंजूर झाल्याने त्याचे मंजुरी प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या नारायण रामचंद्र राहणे (वय37 वर्ष) या पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील  झुडपात मिळून आला. सदर व्यक्ती मागील पाच दिवसापासून मिसिंग असल्याची नोंद पालघर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायतराज विभागाच्या वतीने 22 फेब्रुवारी रोजी वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाच्या मंजुरी पत्राचे व प्रथम हप्त्याचे वितरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन 2024 पंचवीस या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन-चार एकूण 59,535 मंजुरी पत्र व 24890 प्रथम हप्त्याचे वितरण करण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेने आयोजित केला होता.

भोपोली येथील अपंग असलेले गरीब शेतकरी रामचंद्र रहाणे हे जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजना मंजुरी पत्राचे स्वीकार करण्यासाठी त्याला येणे शक्य नसल्याने त्यांनी आपला मुलगा नारायण रहाणे याला पाठविले होते. शनिवारी सदर योजनेचे विवरणपत्र स्वीकारण्यासाठी नारायण जिल्हा परिषद कार्यालयात गेले होते.मात्र त्यानंतर तो घरी परत आला नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो मिळून न आल्याने पालघर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्याचा पाच दिवसापासून शोध घेण्यासाठी नातेवाईकांनी आपल्या टीम सर्वत्र पाठवल्या होत्या तसेच सोशल मीडिया द्वारे आवाहनही करण्यात आले होते. मात्र त्याचा कुठेही पत्ता लागत नसताना बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या लगत असलेल्या झुडपात नारायण रहाणे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला.ह्याबाबत पालघर पोलिसांना कळल्या नंतर पालघर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारी