पालघर, सफाळे रेल्वे रूळावर संतप्त प्रवाशांचं रेल रोको आंदोलन; पश्चिम रेल्वेची सेवा कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 07:10 AM2020-12-02T07:10:19+5:302020-12-02T07:12:38+5:30

पालघर रेल्वे स्टेशन मास्टरने प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन ते मुंबई सेंट्रलला पाठवण्याचं आश्वासन रेल्वे आंदोलकांना दिलं

Palghar, Rail Roko agitation of angry passengers; Western Railway service collapsed | पालघर, सफाळे रेल्वे रूळावर संतप्त प्रवाशांचं रेल रोको आंदोलन; पश्चिम रेल्वेची सेवा कोलमडली

पालघर, सफाळे रेल्वे रूळावर संतप्त प्रवाशांचं रेल रोको आंदोलन; पश्चिम रेल्वेची सेवा कोलमडली

googlenewsNext

पालघर -  मुंबईकडे जाणाऱ्या सौराष्ट्र एक्सप्रेसचं वेळापत्रक बदलल्याने संतप्त प्रवाशांनी पहाटे पालघर येथे रेल्वे रुळावर उतरून निषेध केला, सौराष्ट्र एक्सप्रेस सकाळी ५ वाजून ०५ मिनिटांनी पालघर येथे येत असे, मात्र आता ही वेळ बदलून ती पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी करण्यात आली, त्याचसोबत पालघर स्थानकात येणारी ५ वाजून १५ मिनिटांची लोकल उद्यापासून रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने प्रवाशांनी रेल रोको आंदोलन सुरू केले.

पालघर रेल्वे स्टेशन मास्टरने प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन ते मुंबई सेंट्रलला पाठवण्याचं आश्वासन रेल्वे आंदोलकांना दिलं, पाठवपुरावा करण्यात येणार असल्याचं सांगितल्यानंतर अडवलेली लोकल मुंबईच्या दिशेने सोडण्यात आली, तर काही प्रवासी मुंबई सेंट्रल कार्यालयात जाऊन ह्या विरोधात निवेदन देणार असल्याचं सांगितले

पालघर रेल्वे स्थानकातून सोडण्यात आलेली लोकल केळवे स्थानकात सायडिंगला काढण्यात आली, मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला पुढे सोडण्यात आले. परंतु पालघरपाठोपाठ सफाळे रेल्वे ट्रॅक मध्ये उतरलेल्या प्रवाशांनी राजधानी एक्सप्रेस अडवून ठेवल्याने पश्चिम रेल्वेची सेवा कोलमडली आहे.

Web Title: Palghar, Rail Roko agitation of angry passengers; Western Railway service collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.