पालघर जिल्ह्यात ३२ हजार श्रींची प्राणप्रतिष्ठा!

By Admin | Updated: September 16, 2015 23:27 IST2015-09-16T23:27:58+5:302015-09-16T23:27:58+5:30

महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाचे गुरु वारी आगमन होत आहे. या वर्षी पालघर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे ३२ हजार

Palghar district has 32 thousand Sri Pranaprishtha! | पालघर जिल्ह्यात ३२ हजार श्रींची प्राणप्रतिष्ठा!

पालघर जिल्ह्यात ३२ हजार श्रींची प्राणप्रतिष्ठा!

पालघर : महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाचे गुरु वारी आगमन होत आहे. या वर्षी पालघर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे ३२ हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस आयुक्तालयातून ही माहिती मिळाली. या वर्षी शहरी भागात घरगुती गणेशाची संख्या वाढली आहे. न्यायालयीन तिढ्यामध्ये मंडपांचा आकार अडकल्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळांचे मंडप अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या पंधरवड्यापासून श्री गणेशाच्या स्वागतासाठी सर्वत्र मंगलमय वातावरण तयार होऊ लागले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज झाले असून गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक मंडळांच्या भव्यदिव्य गणेशमूर्ती जल्लोषात आणल्या जात आहेत. जिल्ह्यात २४८७ सार्वजनिक तर ३०,१७४ खाजगी बाप्पांची प्रतिष्ठापना होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Palghar district has 32 thousand Sri Pranaprishtha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.