शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
9
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
10
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
11
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
12
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
13
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
14
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
15
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
16
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
17
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
18
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
19
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
20
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना

पालघर नगर परिषदेला मिळणार अत्याधुनिक मुख्यालय; एकनाथ शिंदे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 06:52 IST

जिल्ह्यातील इतर नगर परिषद मुख्यालयांनाही मिळणार नवी झळाळी

मुंबई : धोकादायक इमारतींमधून मुख्यालयाचे कामकाज चालवणाऱ्या पालघर नगरपरिषदेला त्यासाठी अत्याधुनिक इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून पालघर जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदांच्या मुख्यालय इमारतींनाही नवी झळाळी मिळणार आहे. त्याचबरोबर या आस्थापनांच्या घनकचरा व्यवस्थापन, पाणी योजना आणि रस्त्यांसाठीच्या योजना मार्गी लागणार आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत त्या संदर्भातील आदेश दिले आहेत.

पालघरमधील नगरपरिषदांसमोर विकासकामांबाबतच्या अडचणी नगरविकासमंत्र्यांसमोर मांडण्याकरिता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, श्रीनिवास वनगा, जिल्ह्यातील बहुसंख्य नगरपरिषदांचे नगराध्यक्ष आणि त्यांचे मुख्याधिकारी तसेच जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थित होते.

आदिवासीबहुल असलेल्या पालघर तालुक्याच्या विकासात निधीच्या अनुपलब्धता हा मुख्य अडसर असल्याचे गाºहाणे या सगळ्या लोकप्रतिनिधींनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली. जल योजना, घनकचरा व्यवस्थापन, गटारे, रस्ते आणि प्रशासकीय इमारतींची अवस्था असे मुद्दे या वेळी चर्चेस आले. शासकीय पदे रिक्त असल्याने प्रशासकीय अडचणी उभ्या राहत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. या समस्यांची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.जव्हारचा पर्यटनस्थळ म्हणून विकास

पालघर जिल्ह्यातील जव्हार हे थंड हवेचे ठिकाण, महाबळेश्वरसारखे विकसित करण्याचा विचारही पालकमंत्र्यांनी या वेळी बोलून दाखवला. त्यासाठी पालघर परिसरात पर्यटनस्नेही वातावरण तसेच सोयी-सुविधा उभारण्याला प्राधान्य देण्याचे आदेश त्यांनी दिले. जव्हार येथे असलेला जुना राजवाडा नगरपरिषदेच्या ताब्यात आला असून पर्यटकांसाठी हॉटेल म्हणून विकसित करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चाही या वेळी झाली.

वाडा येथे अग्निशमन दल

वाडा येथे होणाऱ्या फटाकेविक्रीच्या व्यवसायात ५०० कोटींची उलाढाल होते. दिवाळीदरम्यान होणाऱ्या या फटाके विक्रीच्या व्यवसायादरम्यान मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. इथे अग्निशमन दलाची विकसित सोय नसल्यामुळे गंभीर परिस्थिती उभी राहू शकते, त्यासाठी तेथे स्वतंत्र अग्निशमन दलाची व्यवस्था असावी, अशी तेथील नगराध्यक्षांची मागणी होती. त्या संदर्भात वाडा येथे अग्निशमन दल उभारणीबाबत चाचपणी करण्याचे निर्देश नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv Senaशिवसेनाpalgharपालघरmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी