शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Palghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 09:13 IST

पालघरमधील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड पाहायला मिळत आहे. यावरुन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. 

पालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी अशी लढत याठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र भाजपा आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, पालघरमधील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड पाहायला मिळत आहे. यावरुन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. 

पालघर पोटनिवडणुकीत भाजपा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी प्रशासनाला हाताला धरून मुद्दामहून इव्हीएम बंद ठेवल्या असून इथले मतदान आम्हाला होऊ नये असा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अनेक सोसायटींमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोन करून नागरिकांना आमिष दाखवत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. माध्यम प्रतिनिधींचे फोन गेल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली, अशीही माहिती त्यांनी दिली.

(Lok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड)

''भाजपा रडीचा डाव खेळत आहे. बहुजन विकास आघाडीचे जिथे वर्चस्व आहे, त्याच भागात EVM बंद कसे सुरू नाहीत'', असा सवाल उपस्थित करत हितेंद्र ठाकूर यांनी भाजपा साम-दाम-दंड-भेदचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान,''मतदानाची वेळ दोन तासाने वाढवून द्यावी'', अशी मागणीही हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. 

दरम्यान, श्रीनिवास वनगा (शिवसेना), राजेंद्र गावित (भाजपा), दामू शिंगडा (काँग्रेस), बळीराम जाधव (बविआ), किरण गहला (मार्क्सवादी) यांच्यामध्ये मुख्य पंचरंगी लढत आहे.

 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018ElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण