शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सूर्या प्रकल्पाचे कालवे ४० वर्षानंतरही अपूर्णच, शासन व लोकप्रतिनिधींकडून उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 3:11 AM

जिल्हयातील शेतीला उन्हाळयात पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अपूर्ण अवस्थेत असल्याने संबधित क्षेत्रातील शेतक-यांची घोर निराशा झाली आहे. कालवे तयार करण्यासाठी करोडो रूपयांचा केलेला शासनाचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे जिल्हयातील ग्रामीण भागाला हरीत क्रांतीचे स्वप्न अपूरे राहणार आहे.

शशिकांत ठाकूर ।कासा : जिल्हयातील शेतीला उन्हाळयात पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अपूर्ण अवस्थेत असल्याने संबधित क्षेत्रातील शेतक-यांची घोर निराशा झाली आहे. कालवे तयार करण्यासाठी करोडो रूपयांचा केलेला शासनाचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे जिल्हयातील ग्रामीण भागाला हरीत क्रांतीचे स्वप्न अपूरे राहणार आहे.सिंचन हा प्रमुख उद्देश ठेवून सन १९७५ साली कासा जवळील धामणी येथे सूर्यानदीवर धरण बांधण्यात आले व त्याखाली पाणी नदीत व कालव्यात सोडण्यासाठी व नियंत्रणासाठी कडवास हे मातीभरावाचे धरण बांधण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत पालघर ८५२५ हेक्टर, डहणू, ६१४१ हेक्टर विक्रमगड ३० हेक्टर अशी एकूण १६६९६ हेक्टर जमीन ओलीताखाली आणण्यात आली. या सूर्या प्रकल्पासाठी धामणी, सावा, भिवाडी, धरमपूर, कवडास, शेणसरी, तलवाडा आदी गावातील शेकडो कुटुंबे विस्थापित करण्यात आली. व त्याचे पुनर्वसन वाणगांव जवळील चंद्रनगर, हनुमान नगर येथे करण्यात आले. मात्र त्यांनाही अद्याप सर्वच भौतिक सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. तसेच शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कालवे तयार करण्यात आले व त्यासाठी शेतकºयांच्या जमीनी संपादित करण्यात आल्या मात्र त्यापैकी आंबेदा, बºहाणपूर, सोमटा, चिंचपाडा भागातील काही शेतकाºयांना कालव्यात गेलेल्या जमीनीचा अद्याप मोबदलाही मिळालेला नाही. दरम्यान वनजमीनीच्या अडथळयामुळे डावा तीर मुख्य कालव्याचे सुमारे दिड ते दोन किमी काम अपूर्ण आहे. त्यामुळे सुमारे २२०६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही. त्यामुळे किराट, आलोंडे, फुलपाडा, नागझरी, निहे दामखिंड, वेळगांवा, चरी, गुंदले, करवेले, पांदरे, गिरनोली, पडघे, वारंघडे आदी गावांतील शेतकºयांना अद्याप पाणी मिळालेले नाही. मात्र मुख्यकालव्याचे काम अपूर्ण असतांना गावागावात व शेताकडे जाणारे उपकालवे तयार करण्यात आले आणि पाण्याचा ठावठिकाणा नसतांनाही २० वर्षापूर्वी या कालव्याचे पक्के बांधकाम व दुरूस्तीसाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले. त्यामुळे कालवे खोदून ४० वर्षे झाली तरी शेतकºयांना पाणीही नाही आणि जमीनीही गेल्या अशी स्थिती झाली आहे. १० वर्षापूर्वी सूर्याकालव्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे कारणपुढे करत सूर्याची सर्व कार्यालये बंद करून ती शहपूर येथील भातसा कालवा क्र. ११ ला जोडण्यात आले मात्र मागील वर्षापासून शेतकºयांनी वारंवार मागणी केल्याने हे कार्यालय पुन्हा मनोर येथे सुरू करण्यात आले. मात्र दुरूस्तीची व साफसफाईची वेळोवेळी कामे न केल्याने कालव्यातून ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने शेतीला अपूरा पाणी पूरवठा होत आहे.सूर्या प्रकल्पाचे काम आदिवासी विकास विभागाच्या निधीतून झाले आहे. त्यामुळे त्याचा लाभ येथील शेतकºयांना झाला पाहिजे आणि प्रकल्पाचे काम अपूर्ण असतांना बाहेर पाणी देवू नये.-राजेंद्र गावित, माजी राज्यमंत्री