तलासरी ७२ तासांपासून ‘आऊट आॅफ कव्हरेज’
By Admin | Updated: January 16, 2016 00:23 IST2016-01-16T00:23:08+5:302016-01-16T00:23:08+5:30
चारोटी व सावटा दरम्यानची ओएफसी केबल तुटल्याने येथील दूरध्वनी यंत्रणा बुधवारी सकाळपासून बंद पडली असून एसटीडी, आयएसडी तसेच इंटरनेट न मिळाल्याने बँका, पोस्टाचे

तलासरी ७२ तासांपासून ‘आऊट आॅफ कव्हरेज’
- सुरेश काटे, तलासरी
चारोटी व सावटा दरम्यानची ओएफसी केबल तुटल्याने येथील दूरध्वनी यंत्रणा बुधवारी सकाळपासून बंद पडली असून एसटीडी, आयएसडी तसेच इंटरनेट न मिळाल्याने बँका, पोस्टाचे व्यवहार कोलमडले आहेत. तसेच शासकीय कामकाजही रखडले व त्याचा फटका ग्राहकांना तसेच नागरिकांना बसला.
एकं दर या प्रकारामुळे या भागातील नागरिकांनी गत ७२ तासांत आऊट आॅफ कव्हरेजचा अनुभव घेतला आहे. बंद पडलेली यंत्रणा सुरू करण्यासाठी बीएसएनएलचा एकही अधिकारी फिरकला नसल्याने जनतेच्या संतापात भर पडली आहे. सणावारासाठी खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांना बँकेतून पैसे काढता आले नाही. तसेच इंटरनेट नसल्याने पोस्टाचेही व्यवहार करता आले नाहीत. विद्यार्थ्यांना आपले
आॅनलाइन फॉर्म भरत न आल्याने त्यांचेही नुकसान झाले. नेट सेवा नसल्याने शासकीय कार्यालयातूनही नागरिकांना दाखले न मिळाल्याने त्यांची कामेही रखडली.
नागरिकांनी विचारणा केली असता त्याबाबत कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. तसेच अधिकारी दूरध्वनी केंद्राकडे फिरकलेही नाही. दूरध्वनी व इंटरनेटसेवा कधी सुरू होणार, याची शाश्वती नसल्याने नागरिक संभ्रमात आहेत. याबाबत तलासरी दूरध्वनी विभागाचे उपअभियंता रामकृष्णहरी कपटकर यांच्याकडे विचारणा केली असता चारोटी व सावटा येथे ओएफसी केबल तुटल्याने या सेवा बंद असल्याचे सांगण्यात आले.