महागाईविरोधात सेनेची नालासोपा-यात निदर्शने, फसव्या आश्वासनांचा जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 03:22 IST2017-09-29T03:21:55+5:302017-09-29T03:22:08+5:30
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईसह इतर गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नालासोपारा शहरात शिवसेनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

महागाईविरोधात सेनेची नालासोपा-यात निदर्शने, फसव्या आश्वासनांचा जाब
वसई : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईसह इतर गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नालासोपारा शहरात शिवसेनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती, वाढत चाललेली बेरोजगारी, जीएसटी करामुळे बंद पडत चाललेले उद्योग, नोटा बंदीमुळे तब्बल साठ लाख लोकांना गमवावा लागलेला रोजगार, देशाचा कमी होत चाललेला आर्थिक विकास दर, काळा पैसा भारतात आणण्याच्या वचनावरील घुमजाव, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या नेत्यांवर न दाखल झालेले गुन्हे अशा खोट्या व फसव्या आश्वासनांचा जाब विचारण्यासाठी शहरात शिवसैनिकांनी रॅली काढून निदर्शने केली.
यावेळी शिवसैनिकांनी मोदी सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. पालघर जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, विधानसभा संघटक प्रविण म्हाप्रळकर, तालुका महिला आघाडी प्रमुख श्रद्धा राणे, शहर प्रमुख जितेंद्र शिंदे, उपशहर प्रमुख प्रदीप सावंत, नगरसेवक स्वप्नील बांदेकर, उपशहर संघटक रेश्मा सावंत आदींसह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.