शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

‘ऑपरेशन मुस्कान’चे पोलिसांपुढे आव्हान, शोध, पुनर्वसनासाठी १४ दिवसांचा कालावधी बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 00:27 IST

ऑपरेशन मुस्कान ८ या मोहिमेअंतर्गत पोलिसांपुढे अपहरण केलेल्या २०० तर हरवलेल्या सुमारे २ हजार ३९६ अशा एकूण २ हजार ५९६ लोकांना शोधून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

- हितेन नाईकपालघर : अपहरण आणि हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी पालघर जिल्ह्यात पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन मुस्कान ८ या मोहिमेअंतर्गत पोलिसांपुढे अपहरण केलेल्या २०० तर हरवलेल्या सुमारे २ हजार ३९६ अशा एकूण २ हजार ५९६ लोकांना शोधून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्याच्यासमोर आता अवघ्या १४ दिवसांचा कालावधी हाती उरला आहे.हरविलेल्या तसेच अपहरण केलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ मार्चदरम्यान आॅपरेशन मुस्कान ८ ही विशेष मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे. सदर आॅपरेशन मुस्कान विशेष मोहीम पालघर जिल्ह्यात देखील सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील एकूण २३ पोलीस ठाण्यांमध्ये एक अधिकारी व ३ कर्मचारी यांचा समावेश असलेले प्रत्येकी एक पथक नेमण्यात आले आहे. या मोहिमेची योग्यरीत्या अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा पोलीस उपअधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २ मार्च २०२० रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बैठक घेण्यात आली होती.स्थानिक गुन्हे शाखा पालघर व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्यात समन्वय करून पालघर जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व रेकॉर्ड व्यतिरिक्त बेवारस बालकांचा जातीने लक्ष पुरवीत त्यांचा शोध घेऊन ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उपअधीक्षक विक्रांंत देशमुख यांनी सांगितले. परंतु सध्या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येत मुलांचे अपहरण होत असताना त्यांचा शोध घेण्याची व त्यांच्या पालकांपर्यंत त्यांना सुखरूप पोचवण्याचे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने देशात व सर्वच राज्यात अपहरण व हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्या अंतर्गत हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ८ ही मोहीम पालघर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहे. मुलांचे आश्रमगृह अशासकीय संस्था रेल्वे स्थानक बस स्थानक रस्त्यात भीक मागणारी अथवा वस्तू विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रुग्णालय, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी कामावर असलेली मुले त्यांचे फोटो घेऊन त्यांचे अद्ययावत माहिती तयार करण्यात येणार असून सदर कालावधीत सापडलेल्या मुलांची माहिती घेऊन त्यांचे आई-वडील किंवा त्यांचे कायदेशीर पालक यांच्याकडे सुपूर्द करण्यात येण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर मोहिमेअंतर्गत हरवलेला जास्तीत जास्त बालकांचा शोध घेण्यात येऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. अपहरण केलेल्या हरवलेल्या व बेवारस मुलाचा शोध लागल्यावर त्यांना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ज्या मुलाचे पालक मुलगा आपला असल्याचा दावा करतील त्यांना आपले पालकत्वाचे पुरावे द्यावे लागणार आहेत.देशात प्रतिवर्षी एक लाख बालके हरवल्याची, बेवारस झाल्याची नोंददेशात साधारण प्रति वर्षी १ लाख बालक हरवल्याची व बेवारसाची नोंद होत असते. यातील ११ हजार मुले पुन्हा घरी परतली नसल्याचे एक अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील बहुतांश मुले ही तस्करी, बालमजुरी व वेशावृत्ती याकरिता संघटित गुन्हेगारांमार्फत गायब केली जात असल्याचे तपासाअंती निदर्शनास आले आहे. मुस्कान ८ ही मोहीम स्थानीय गुन्हे शाखा पालघर व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्याशी समन्वय करून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व विनारेकॉर्डवरील बालकांचा जास्तीत जास्त शोध घेऊन ही मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्र ांत देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार