शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

वसई तालुक्यात आॅनलाईन सातबारा ठरतोय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 00:29 IST

शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली असली तरी मात्र वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद असल्याने सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही.

- आशिष राणेवसई - शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली असली तरी मात्र वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद असल्याने सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही. परिणामी शेतकºयांना व गरजूंना वेळेवर कामे करणे अवघड होत आहेत. त्यामुळे वर्षोनुवर्षे सुरू असलेले हे आॅनलाईन सातबाराचे काम आता शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.दरम्यान अचूक संगणकीकृत सातबारा देण्यासाठी राज्यात भूमि अभिलेख विभागाकडून केंद्र पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकार्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम राबविण्यात येत आहे.त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफारची प्रणाली विकसीत केली आहे. त्यातच फोर-टी क्वाईन हे साफ्टवेअर बंद होऊन आता क्लाऊड सॉफ्टवेअर हे नव्याने सुरु करण्यात आले आहे,नेहमीच सरकार नवनविन प्रणाली राबवते, त्यात आता सद्यस्थितीत नवीन क्लाऊड सॉफ्टवेअरला तहसीलदार सहीत मंडळ अधिकारी व तलाठ्यांचे ठसे नोंदणी करीता ओटीपी नंबर टाकून नोंद करावी लागते. मात्र कधी सर्व्हर डाऊन तर कधी लिंकच फेल होत असल्याने सामान्य जनतेला व शेतकºयांना वेळीच सातबारा मिळण्यास मोठी अडचण होत आहे. काहीवेळा सर्व्हर सुरु होतो मात्र त्यात गती नसल्याने कामे होत नाहीत. त्यात विजेच्या लपंडावाची भर पडते तर कधी संगणकाच्या नादुरूस्तीने खोळंबा होत असतो.सगळे दाखवतात एकमेकांकडे बोट, प्रचंड चुका, तहसीलदार लक्ष देत नाहीत ? गठठे पडूनआनलाईन सातबारात प्रचंड चुका असल्याने त्या दुरु स्तीसाठी पुन्हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार वसई तालुका तहसीलदारांच्याकडे अर्ज करावा लागतो. या प्रक्रि येतही बराच वेळ जात आहे. तलाठी, तहसील कार्यालयाकडे बोट दाखवत आहेत, तर कधी मंडळ अधिकारी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला जातो.त्यामुळे सामान्य वर्ग,आदिवासी शेतकºयांना मुलांच्या विविध दाखल्यांसाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक कर्ज अथवा इतर कामे अद्यावत करण्यासाठी या सातबाराची मोठी गरज भासत आहे. मात्र, सातबारा चुकीचा असल्याने व चुकांची दुरु स्ती करण्यात वर्षोनुवर्षे वेळ लागत असल्याने आॅनलाईन सातबारा सामान्य जनता,आदिवासी ,व शेतकºयांसाठी बºयापैकी तापदायक ठरत आहे.आॅनलाईन सातबारा चे संगणकीय कामकाज पूर्ण झाले असून केवळ आता सातबारा व फेरफार चुका आहेत,त्या दुरु स्ती चे काम कलम १५५ नुसार सुरू आहे,लवकर च हे काम पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे- किरण सुरवसे, वसई तहसीलदार, वसई तालुका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार