अधिकाऱ्यांना कारवाई करावीच लागली

By Admin | Updated: May 4, 2017 05:36 IST2017-05-04T05:36:20+5:302017-05-04T05:36:20+5:30

माहीम अंतर्गत सर्व्हे नंबर ८३७ या गुरचरण व राखीव भूखंडावरील अनधिकृत बांधकामावर पालघरचे मंडळ अधिकारी

The officials had to take action | अधिकाऱ्यांना कारवाई करावीच लागली

अधिकाऱ्यांना कारवाई करावीच लागली

 पालघर : माहीम अंतर्गत सर्व्हे नंबर ८३७ या गुरचरण व राखीव भूखंडावरील अनधिकृत बांधकामावर पालघरचे मंडळ अधिकारी राजेंद्र पाटील यांनी वरवरची कारवाई केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे केल्यानंतर बुधवारी मंडळ अधिकाऱ्यावर पुन्हा कारवाई करण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे बेकायदेशीर बांधकामांना मंडळ अधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याची चर्चा शहरात होत आहे.
ब्रिटिश कालावधी पासून गावाच्या निरिनराळ्या सार्वजनिक वापरासाठी गुरचरण, गायरान इ. शासकीय जमिनी संबंधित ग्रामपंचायतीकडे बहाल करण्यात आल्या होत्या. मात्र या जमिनी बळकाविण्याचे प्रकार वाढीस लागले होते. या भूमाफियांना स्थानिक महसूल अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनी लाटण्याचा व त्यावर बेकायदेशीर बांधकामे करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
माहीम ग्रामपंचायत अंतर्गत नवोदय विद्यालया जवळ सर्व्हेे नंबर ८३७/१/१ या गुरूचरण जागेवर काही लोकांनी चाळी आणि घरे बांधल्याची तक्रार माहिती अधिकारी कार्यकर्ता निलेश म्हात्रे यांनी तहसीलदार महेश सागर यांच्याकडे केली होती. तहसीलदारांच्या आदेशाने दि.२६ एप्रिल रोजी पालघरचे मंडळ अधिकारी राजेंद्र पाटील यांनी जेसीबी च्या सहाय्याने घटनास्थळी जाऊन अतिक्र मणावर थातूर मातूर कारवाई केली होती. तक्रारदार म्हात्रे यांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा जाऊन या जागेवर अस्तित्वात असलेले उर्वरित बांधकाम पाडून टाकण्याची नामुष्की मंडळ अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यावर ओढवली. आता पर्यंत निलेश म्हात्रे यांनी १३० एकर शासकीय जागा शासनाकडे जमा करण्यात यश मिळविले आहे. सध्या पालघर मंडळ अधिकाऱ्याचा कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात शासकीय जागेवर अतिक्रमणे, अनिधकृत चाळी बांधणे, विना रॉयल्टीची कामे करणे, कमी रॉयल्टी दाखवून दुप्पट खनिजे वापरणे कामे करणे हे प्रकार सर्रास सुरु असून बेकायदेशीर कामाना संरक्षण देण्याचे काम पालघर मंडळ अधिकारी कार्यालयातून होत असल्याचा आरोप केला जात आहे. आदल्या दिवशी केलेली कारवाई चिल्लर ठरून दुसऱ्या दिवशी कठोर कारवाई करण्याची वेळ मंडळ अधिकाऱ्यावर येण्याचीही पहिलीच घटना असावी. (प्रतिनिधी)

Web Title: The officials had to take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.