सर्वसाधारण सभेला अधिकाऱ्यांची दांडी
By Admin | Updated: September 5, 2015 22:42 IST2015-09-05T22:42:49+5:302015-09-05T22:42:49+5:30
पालघर तालुका पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेला विविध खात्याचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने तालुक्यातील सर्वसामान्यांच्या समस्या सुटत नाहीत.

सर्वसाधारण सभेला अधिकाऱ्यांची दांडी
पालघर : पालघर तालुका पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेला विविध खात्याचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने तालुक्यातील सर्वसामान्यांच्या समस्या सुटत नाहीत. सभेमध्ये अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करूनही शुक्रवारच्या सभेत सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने सभापतीसह सर्वसदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त केला.
पालघर पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व असून निवडणूक आल्यानंतर आजपर्यंत आठ मासिक सभा घेण्यात आल्या. या सभेत तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका कृषी अधिकारी, विद्युत वितरणचे पालघर, बोईसर, सफाळा, एस.टी महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, मत्स्यव्यवसाय इ. महत्वपूर्ण विभागाचे सक्षम अधिकारी उपस्थित राहत नसल्याने तालुक्यातील समस्यावर उपाययोजना आखणे पंचायत समिती सदस्याना कठीण होऊन बसले होते. पालघर तालुक्यात आरोग्य यंत्रणांचा ढिसाळपणा, कांद्रेभुरे नळपाणी पुरवठा योजनेचे सर्वेक्षण, दुर्गम भागातील शाळामध्ये विद्यार्थ्यांना प्यावे लागणारे दुषीत पाणी, अनेक शाळामध्ये शिक्षकांच्या रिक्त पद आदी महत्वाचे विषय असल्याने नाराजी व्यक्त
झाली.