शिष्यवृत्ती अपहार केंद्रप्रमुख संजय गायकवाडवर गुन्हा
By Admin | Updated: October 31, 2015 22:27 IST2015-10-31T22:27:54+5:302015-10-31T22:27:54+5:30
सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्तीचे मुलांना वाटप न करता वाडा तालुक्यातील घोणसईच्या केंद्रप्रमुखांनी ती रक्कम स्वत:च हडप केली. तसेच शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांचे

शिष्यवृत्ती अपहार केंद्रप्रमुख संजय गायकवाडवर गुन्हा
वाडा : सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्तीचे मुलांना वाटप न करता वाडा तालुक्यातील घोणसईच्या केंद्रप्रमुखांनी ती रक्कम स्वत:च हडप केली. तसेच शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांचे पैसेही परस्पर काढून घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोणसईचे केंद्रप्रमुख संजय गायकवाड यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम शाळांच्या खात्यावर जमा न करता परस्पर काढून तिचा वैयक्तिक कारणासाठी वापर केला. याबरोबरच वडवली मराठी शाळेच्या शिक्षिका गायत्री देशपांडे यांच्या वैद्यकीय बिलाची रक्कम व रमाबाई परदेशी शाळा मेट या दोन्ही शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांची रक्कम तसेच शिक्षकांच्या पोस्ट खात्यात भरणा न केलेले पैसे अशा एकूण ९ लाख ८७ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गायकवाड यांच्यावर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायकवाड हे फरारी असून पोलीस उपनिरीक्षक कलगौंडा पाटील याचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, गायकवाड यांचे निलंबन करून त्यांना सेवेतून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)