शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

दिव्यांग विद्यार्थी बनले ओशन हीरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:40 PM

चौपाटीवर स्वच्छता मोहीम; सागरी जैवविविधतेचे घेतले धडे

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे, जिद्द विशेष शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षक व पालकांसह शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी पारनाका समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवले. ड्रॉप्लेज सामाजिक संस्था आणि वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूसीएडब्ल्यूए) या प्राणीमित्र संस्थेने त्याचे आयोजन केले होते. त्यानंतर पशुवैद्य दिनेश विन्हेरकर यांनी त्यांना सागरी जैवविविधता आणि डहाणूतील कासव पुनर्वसन व सुश्रूषा केंद्राची माहिती दिली.ठाणेकर विद्यार्थी त्यांच्या शिक्षक व पालकांसह शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास पारनाका किनाºयावर दाखल झाले. त्यांनी हातात मोजे घालून चौपाटीवर भरतीच्या लाटांसह आलेले प्लास्टिक, पॉलिथीन पिशव्या आणि नायलॉन दोºया गोळा केल्यावर डहाणू नगर परिषदेने त्याचे संकलन केले. या ओशन हिरोजच्या कार्याची दखल स्थानिक आणि पर्यटकांनी घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर सभागृहात पशुवैद्य दिनेश विन्हेरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यांनी समुद्रातील पर्यावरण संरक्षण व संवर्धनाकरिता मदत करणाºया जीवांची माहिती ‘ओशन हीरो’ या अ‍ॅनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून दिली. त्यानंतर प्लास्टिकनिर्मित कचºयापासून विविध आजार होऊन हे जीव कसे मृत्युमुखी पडतात. हा कचरा समुद्रात कसा येतो. त्याला रोखण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता याविषयी दृक्श्राव्य माध्यमातून समजावण्यात आले, तर डहाणूतील डब्ल्यूसीएडब्ल्यूए या प्राणीमित्र संस्थेने वन विभागाच्या माध्यमातून सागरी कासवांकरिता सुरू केलेल्या देशातील पहिल्या सुश्रुषा आणि पुनर्वसन केंद्राची माहिती आणि कार्य पद्धती चलचित्रातून दाखवली. कासवांचा जीवनपट पाहून विद्यार्थी भारावले होते. समुद्रकिनारा स्वच्छतेच्या माध्यमातून सागरी जैवविविधतेला हातभार लावण्याची स्वच्छता अभियानाची गरज व्यक्त करण्यात आली.कासवांची कहाणी : कासवाची प्रतिकृती हातात घेऊन पशुवैद्य विन्हेरकर यांनी त्यांची शारीरिक रचना दाखवली तर अ‍ॅनिमेटेड व्हिडिओची मदत घेऊन कासवांच्या जन्मापासून ते खोल समुद्रातील विहार, भक्ष्यांचा शोध, अन्न ग्रहण, प्लास्टिक कचºयामुळे जडणारे विकार तसेच हजार अंड्यातून केवळ २० कासव जगतात. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाची माहिती देण्यात आली.