सार्वजनिक कूपनलिकेवर माजी उपसरपंचाने केला कब्जा
By Admin | Updated: February 15, 2017 04:21 IST2017-02-15T04:21:32+5:302017-02-15T04:21:32+5:30
तालुक्यातील उसर ग्रामपंचायतीकडून १३ वा वित्त आयोग या निधीतून शिंदेवाडी येथे एक कूपनलिका गेल्या काही वर्षां पूर्वी बांधली आहे.

सार्वजनिक कूपनलिकेवर माजी उपसरपंचाने केला कब्जा
वाडा : तालुक्यातील उसर ग्रामपंचायतीकडून १३ वा वित्त आयोग या निधीतून शिंदेवाडी येथे एक कूपनलिका गेल्या काही वर्षां पूर्वी बांधली आहे. तिच्यावर माजी उपसरपंच प्रेमा शिंदे यांनी कब्जा करून गावातील अन्य नागरिकांना पाणी भरण्यास मज्जाव केला जात आहे. याबाबत वारंवार तक्र ारी करूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नसल्याच्या निषेधार्थ व कुपनलिका खुली करावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी येथील ग्रामस्थांनी सोमवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
याबाबत पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली असता कुपनलिका खुली करण्याचे निर्देश ग्रामपंचायतीला दिले असतांनाही ते दुर्लक्ष करीत आहेतÞ असा आरोप निवेदनात केला आहे. या उपोषणात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.