शिवाजी महाराज, भवानी मातेबद्दल आक्षेपार्ह मजकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:35 IST2017-08-12T23:34:57+5:302017-08-12T23:35:01+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणा-या नितीन मोहितेला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे.

शिवाजी महाराज, भवानी मातेबद्दल आक्षेपार्ह मजकूर
वसई : छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणाºया नितीन मोहितेला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. तो आयडीबीआय कॉलनीत राहणारा आहे.
त्याने फेसबुकवर आपल्या मित्रांशी चॅटिंग करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेबद्दल अतिशय अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. त्या मजकुरावरून मित्रांमध्ये फेसबुकच्या माध्यमातून वाद झाल्याने, तो व्हायरल झाल्यानंतर संतापलेल्या अनेकांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी निळेगावात राहणा-या अतुल माने यांची तक्रार नोंदवून घेऊन, नितीन मोहितेविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे समजताच तो पसार झाला होता. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, संतापलेल्या तरुणांनी त्याला धडा शिकविण्यासाठी त्याचे घरही गाठले होते.