महागाईचे चटके आता रुग्णांनाही

By Admin | Updated: August 24, 2015 23:14 IST2015-08-24T23:14:14+5:302015-08-24T23:14:14+5:30

अतिदुर्गम आदिवासी भागातील बाजारपेठ असलेल्या मनोर येथे खाजगी क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरांनी आपली फी तीस ते पन्नास टक्के वाढविल्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठी

Now the inflation rates of the patients | महागाईचे चटके आता रुग्णांनाही

महागाईचे चटके आता रुग्णांनाही

मनोर : अतिदुर्गम आदिवासी भागातील बाजारपेठ असलेल्या मनोर येथे खाजगी क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरांनी आपली फी तीस ते पन्नास टक्के वाढविल्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठी कुचंबणा झाली आहे. त्यामुळे महागाईचे चटके आता रुग्णांनाही बसू लागले आहेत.
येथील डॉक्टर असोसिएशनने मनोर येथील क्लिनिक व खाजगी रुग्णालयामध्ये आकारल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या फीमध्ये वाढ केली आहे. फक्त रुग्ण तपासणी ७० रु., तपासणी व इंजेक्शन १०० रु., ड्रेसिंग ५०, रक्तदाब तपसणी ७० रु. तसेच रुग्णांच्या घरी जाण्याचे दिवसा ३०० रुपये तर रात्री ५०० रु. व्हिजिट फी निश्चित करण्यात आली आहे. तसेच सलाईन लावण्याचे ३०० रु., बाहेरून आणलेले इंजेक्शन देण्याचे ५० रु. घेतले जातात. मनोर परिसरातील ९० टक्के म्हणजे ५० ते ६० गावे ही आदिवासी आहेत. त्यामुळे ही अव्वाच्या सव्वा फीवाढ त्यांना असह्य ठरणारी आहे. (वार्ताहर)

मनोर डॉक्टर असो. चा युक्तिवाद...
१ डॉ. प्रशांत लोणावरे, अध्यक्ष मनोर डॉक्टर असोसिएशन यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, २० ते २५ वर्षांनी आम्ही फी वाढविली आहे. पहिले आम्ही ४० रुपये घेत होतो. आता ३० रुपये वाढवून तपासणी ७० रुपये केली आहे.
२ औषधकोटा तीन दिवसांऐवजी आठ दिवसांचा देतो. त्याचे वाढीव पैसे घेतो, तसेच प्रत्येक वस्तूच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आम्हाला सध्याचे दर न परवडणारे आहेत. त्यामुळे तपासणी फी, इंजेक्शन, ड्रेसिंग, रक्तदाब, व्हिजिटची याची फी वाढविली आहे.
३ डॉ. सातवी, डॉ. संजय लोणावरे, डॉ. देव व डॉ. पडवळे चर्चेमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, आम्हालाही सगळ्यांचे भाडे, लाईट बिल, वैद्यकीय कर्मचारी व मेडिसिनसाठी भरपूर खर्च येतो. त्यामुळे आम्ही पालघर येथील डॉक्टरांसारखी फी घेत नाही. आपला परिसर अतिदुर्गम आहे, गरीब आहे,याची आम्हालाही जाण आहे हे लक्षात घेऊनच किमान दरवाढ केली आहे.

Web Title: Now the inflation rates of the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.