शेतकऱ्यांवर आता दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 01:12 AM2019-11-11T01:12:23+5:302019-11-11T01:12:28+5:30

वाडा तालुक्यातील बरेचसे शेतकरी भातपीक घेतल्यानंतर त्याच जमिनीत वाल, तूर, मूग, हरभरा, तीळ अशी रब्बीची पिके घेत असतो.

Now a double crisis on the farmers | शेतकऱ्यांवर आता दुहेरी संकट

शेतकऱ्यांवर आता दुहेरी संकट

Next

वसंत भोईर
वाडा : वाडा तालुक्यातील बरेचसे शेतकरी भातपीक घेतल्यानंतर त्याच जमिनीत वाल, तूर, मूग, हरभरा, तीळ अशी रब्बीची पिके घेत असतो. मात्र अवकाळी पावसामुळे अजूनही शेतात पाणी असल्याने आणि रब्बी पिकाचा हंगामही निघून गेल्याने यावर्षी शेतकऱ्यांना रब्बी पिकाला मुकावे लागले आहे. काही शेतकरी रब्बीमध्ये हरभºयाचे पीक लवकर घेण्यासाठी भातपीक न घेता जमीन तशीच ओसाड (रब्बी) ठेवतात, या शेतकºयांवर तर मोठे संकट ओढावले आहे.
वाडा तालुक्यातील गातेस खुर्द आणि गातेस बुद्रुक या दोन गावांमध्ये रब्बीमध्ये दोनशे एकर शेत जमिनीत हरभरा पीक घेतले जाते. यासाठी येथील शेतकरी पावसाळ्यात या जमिनीत भातपीक घेत नाहीत. मात्र, आजही या शेतांमध्ये पाणी भरलेले असल्याने आणि हरभरा पेरणीचा हंगाम निघून गेल्याने या दोन्ही गावातील १२७ शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
येथील शेतकरी रब्बी (ओसाड) ठेवलेल्या जागेत दिवाळीपूर्वीच हरभराची पेरणी करतात. आॅक्टोबरमधील उष्णतेमुळे हरभरा पिकाची उगवण चांगली होते, आणि नोव्हेंबर अखेरच्या थंडीमुळे फुटवा चांगला होऊन डिसेंबर अखेरीस उत्पादनालाही सुरवात होते. मात्र, अवकाळी पावसाने येथील शेतकºयांचे हरभरा पिकाचे वेळेचे गणितच बिघडवले आहे.
येथील शेतकºयांनी ८५०० रुपये प्रती क्विंटल दराने हरभºयाचे बियाणे खरेदी केले असून पेरणी लांबल्याने हे बियाणेही खराब होऊन फुकट जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. काही शेतकºयांनी सुकलेल्या रब्बीच्या जागेत दोन दिवसांपुर्वी हरभराची पेरणी केली होती. मात्र, शुक्रवारी वारी झालेल्या पावसामध्ये ही कुजून पेरणी वाया जाण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, वाडा आणि विक्र मगड तालुक्यातील अन्य शेतकरी भातपिकानंतर घेत असलेल्या वाल, मूग, तूर, हरभरा या रब्बी
पिकाला मुकला आहे. शेतात अजूनही पाणी, ओलावा असल्याने एक महिना रब्बी पिकाची पेरणी करता
येणार नाही.
>शेतकरी राहणार वंचित
दोन वर्षांपूर्वी गातेस खुर्द आणि गातेस बुद्रुक येथील ६० शेतकºयांनी ४० लाख रुपयांचे हरभºयाचे उत्पादन घेतले होते. आता हरभरा पीक घेणाºया शेतकºयांची संख्या दुप्पट झाली आहे. मात्र या रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकºयांना हरभरा पिकापासून वंचित रहावे लागले आहे.
नोव्हेंबर महिन्यात हरभरा पीक फुलावर येते. डिसेंबर महिन्यात हरभºयाचे उत्पन्न सुरु होते. हरभरा पिकाचा हंगाम पावसात गेल्याने हे पीक घेणाºया शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.
- कुमार पष्टे, हरभरा उत्पादक
शेतकरी, गातेस, ता. वाडा.

Web Title: Now a double crisis on the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.