पंचायत समितीच्या नऊ खातेप्रमुखांना नोटिसा

By Admin | Updated: February 5, 2017 02:19 IST2017-02-05T02:19:43+5:302017-02-05T02:19:43+5:30

लेखा परिक्षण अहवालातील प्रलंबित मुद्यांची पूर्तता न केल्याप्रकरणी वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नऊ खातेप्रमुखांना नोटीसा बजावल्या आहेत. याबाबतीत त्वरीत

Notices to nine head of the Panchayat Samiti | पंचायत समितीच्या नऊ खातेप्रमुखांना नोटिसा

पंचायत समितीच्या नऊ खातेप्रमुखांना नोटिसा

वसई : लेखा परिक्षण अहवालातील प्रलंबित मुद्यांची पूर्तता न केल्याप्रकरणी वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नऊ खातेप्रमुखांना नोटीसा बजावल्या आहेत. याबाबतीत त्वरीत कार्यवाही झाली नाही तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही खातेप्रमुखांना देण्यात आलेली आहे.
स्थानिक निधी लेखा, पंचायत राज समिती आणि महालेखाकार यांच्या अहवालात वसई पंचायत समितीच्या विविध खात्यांंना खुलासा मागवण्यात आलेला आहे. मात्र, त्याबाबतीत संंबंधितांकडून योग्य ती कार्यवाही न झाल्याने लेखापरिक्षण अहवालातील त्रुटी प्रलंबित राहिल्या आहेत. त्याप्रकरणी जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीकडे खुलासा मागण्यात आला आहे.
याप्रकरणाची गंभीर दखल वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शीतल पुंड यांनी घेऊन नऊ खातेप्रमुखांना नोटीसा बजावल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी पंचायत समितीला पत्र पाठवून लेखापरिक्षण प्रलंबित मुद्यांची पूर्तता न केल्याबदद्ल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. लेखा परिक्षण मुद्यांची पूर्तता करण्यासाठी मान्सून कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दिष्ट साध्य न केल्यामुळे जिल्ह्याच्या रँकींगवर परिणाम झाल्याने चौधरी यांनी संबंधितांना खडसावले आहे.
याप्रकरणी वारंवार सूचित करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे, अशी माझी धारणा झालेली आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) १९७९ अन्वये कर्तव्यात कसूर केलेली आहे. सबब आपणाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे का पाठविण्यात येऊ नये. याबाबतीत आपल्या कामकाजाची नोंद आपल्या गोपनीय अहवालात का घेण्यात येऊ नये याचा खुलासा करावा. तो समाधानकारक नसल्यास शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशारा पुंड यांनी खातेप्रमुखांना दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Notices to nine head of the Panchayat Samiti