वसईतील ४३ शाळा बंद करण्याची नोटीस, संस्थाचालकांवर होणार फौजदारी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 03:50 AM2017-12-24T03:50:08+5:302017-12-24T03:50:16+5:30

वसई विरार परिसरात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या ४३ खाजगी शाळांना त्या बंद करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यकती कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

Notice for closure of 43 schools in Vasai, institutional operators will face criminal offenses | वसईतील ४३ शाळा बंद करण्याची नोटीस, संस्थाचालकांवर होणार फौजदारी गुन्हे

वसईतील ४३ शाळा बंद करण्याची नोटीस, संस्थाचालकांवर होणार फौजदारी गुन्हे

Next

वसई : वसई विरार परिसरात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या ४३ खाजगी शाळांना त्या बंद करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यकती कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
वसई तालुक्यात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाºया खाजगी शाळांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने त्या बंद करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी सात वेळा शिक्षण खात्याकडे केली होती. मात्र, त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने आमदार आनंद ठाकूर यांनी हिवाळी अधिवेशनात हा विषय मांडला होता. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या ४३ शाळा बंद करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती दिली. शाळा बंद करण्यासोबतच या शाळांच्या शिक्षण संस्था चालकांविरोधात फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत.

नोटिसा बजाविलेल्या ४३ शाळांची यादी
डॉ. दी. ज. गाळवणकर इंग्लिश हायस्कूल (अर्नाळा), रामकृष्ण इंग्लिश स्कूल (बोळींज), प्रार्थना स्कूल (कामण), लिटल एंजल्स हायस्कूल (कामण), बाबा इंग्लिश स्कूल (देवदळ, कामण), भावधारा अ‍ॅकॅडमी (कातकरी पाडा, चंदनसार), अदिन अ‍ॅकॅडमी (राईपाडा), सलम इंग्लिश स्कूल (कोपरी), सिद्धी विनायक स्कूल (भाटपाडा), चेलंगी अ‍ॅकॅडमी (गासकोपरी), बीबीसी हिंदी स्कूल (पाटणकर पार्क, नालासोपारा), राजीव गांधी इंग्रजी माध्यम स्कूल (निळेगाव, नालासोपारा), सेंट जॉन हायस्कूल (आशानगर, कोल्ही), स्वामी विवेकानंद स्कूल (आशानगर, कोल्ही), एम. के. जे. इंग्लिश स्कूल (कोल्ही), सेंट थॉमस स्कूल( चिंचोटी), वन नेस्ट स्कूल (चिंचोटी), एफ. के. अ‍ॅकॅडमी (चिंचोटी), गुरुकूल विद्यालय (उंबरपाडा), सनरोज इंग्लिश स्कूल (मानेचापाडा, नालासोपारा), अ‍ॅम्बेसॅडर स्कूल (पेल्हार), टिष्ट्वंकल लिटील स्टार स्कूल (पेल्हार गाव), मॉर्निंग स्टार स्कूल (वालईपाडा, नालासोपारा), सीतारामा बाप्पा इंग्लिश स्कूल (जाबरपाडा, नालासोपारा), सेंट लॉरेन्स स्कूल (बिलालपाडा, नालासोपारा), आदर्श कलावती विद्यामंदिर (धानीव बाग, नालासोपारा), मारुती विद्यामंदिर (गावदेवी, नालासोपारा), राजीव गांधी मेमोरियल स्कूल (धानीव बाग), फर्स्ट स्टेप स्कूल (धानीवबाग), महात्मा फुले हायस्कूल (धानीव बाग), होरीजन इंग्लिश स्कूल (धानीव बाग), राजापती स्कूल (धानीव बाग), के. नगर इंग्लिश अ‍ॅकॅडमी (धानीव बाग), प्रथमेश पब्लिक हायस्कूल (धानीव बाग), पिरॅमिड स्कूल (वालीव), ट्रेगल अ‍ॅकॅडमी (वालीव), न्यू लिटील स्टार स्कूल (वालीव), वाय. के. पाटील हायस्कूल (फुलपाडा, विरार), सिद्धीविनायक शाळा (गहुक पाडा, विरार), टिष्ट्वंकल हायस्कूल (विरार), दिशा अ‍ॅकॅडमी (नालासोपारा), सूर्योदय बाल विद्यामंदिर इंग्रजी माध्यम (नालासोपारा), सूर्योदय बाळ विद्यामंदिर हिंदी माध्यम (नालासोपारा)

Web Title: Notice for closure of 43 schools in Vasai, institutional operators will face criminal offenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.