पालघरसाठी पुरवठा अधिकारीच नाहीत

By Admin | Updated: August 28, 2015 00:10 IST2015-08-28T00:10:05+5:302015-08-28T00:10:05+5:30

पालघर जिल्ह्णाच्या पुरवठा विभागासाठी राज्यशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर व त्यावर नियुक्त्या होऊनही ठाणे जिल्हा कार्यालयातून त्यांना पदमुक्त करण्यास टाळाटाळ

Not only is the supply officer for Palghar | पालघरसाठी पुरवठा अधिकारीच नाहीत

पालघरसाठी पुरवठा अधिकारीच नाहीत

- हितेन नाईक,  पालघर
पालघर जिल्ह्णाच्या पुरवठा विभागासाठी राज्यशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर व त्यावर नियुक्त्या होऊनही ठाणे जिल्हा कार्यालयातून त्यांना पदमुक्त करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पालघर जिल्ह्णातील धान्यवितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. याचा फायदा घेऊन काळ्याबाजारात धान्याची खुलेआम विक्री केली जात आहे.
ठाणे जिल्ह्णात पुरवठा विभागात एकूण ५५ पदे मंजूर असून त्यातील पालघर जिल्ह्णासाठी दोन लेखापर्यवेक्षक, एक साखर वाटप अधिकारी, एक लघु टंकलेखक, आठ अव्वल कारकून, दहा कोठार अधिकारी, आठ लिपीक, शिपाई पाच, चार सफाई कामगार इ. अशी एकूण ३४ पदे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत. परंतु आजही पालघर जिल्हापुरवठा अधिकारी कार्यालय, एक जिल्हापुरवठा अधिकारी व वाहन चालक या दोनच पदे मंजूर करण्यात आली असून ३-४ उधारीच्या कर्मचाऱ्यावर जिल्हापुरवठा कार्यालयाचा कारभार सध्या सुरू आहे. राज्यशासनाच्या आदेशाला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केराची टोपली दाखविली जात असून ठाणे कार्यालयाने एकाही अधिकारी, कर्मचाऱ्याला पालघर कार्यालयात रुजू होण्यासाठी मुक्त केले नसल्याने पालघर जिल्ह्णात सुरू असलेला धान्याचा काळाबाजार रोखण्यात प्रभारी जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांना यश येत नाही. आज पालकमंत्री विष्णू सवरा यांचा वचकही कमी होत असल्याचे दिसत असल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक पदे रिक्त राहत आहेत. जिल्ह्यात केंद्र व राज्यशासनाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांसाठी प्राधान्य योजनेअंतर्गत तलासरी तालुक्यातील ६३ हजार ७६४ कुटुंबाना १ हजार ९८१ क्विंटल तांदूळ व १ हजार ३२० क्विंटल गहू, जव्हार तालुक्यात ४ हजार ७९१ कुटूंबाना १ हजार ४८८ क्विंटल तांदूळ व ९९२ क्विंटल गहू, मोखाडा तालुक्यात ३३ हजार ८२८ कुटुंबाना १ हजार ५१ क्विंटल तांदूळ व ७०१ क्विंटल गहू, विक्रमगड तालुक्यातील ३६ हजार ३२० कुटुंबांना १ हजार १२८ क्विंटल तांदूळ व १ हजार ८२४ क्विंटल गव्हाचे वाटप होते. परंतु त्यातले लाभर्थ्यांपर्यंत किती पोहचते?

शहरी भागापैकी पालघर तालुक्यातील ३ लाख ३६ हजार ५६० कुटुंबासाठी १० हजार ४५४ क्विंटल तांदुळ व ६ हजार ९६८ क्विंटल गहू, वसई तालुक्यातील ५ लाख ७५ हजार ५६ कुटुंबासाठी १७ हजार ८६१ क्विंटल तांदुळ, व ११ हजार ९०६ क्विंटल गहु तर डहाणूतील १ लाख ९३ हजार ५४३ कुटुंबासाठी ६ हजार ११ क्विंटल तांदुळ व ४ हजार ७ क्विंटल धान्याचे वाटप करण्यात येते. जिल्ह्णात एकूण १३ लाख ७५ हजार ५४ कुटुंबाना ४२ हजार ७१० क्विंटल तांदुळ व ९ हजार ७८० क्विंटल गहू प्रत्येक महिन्यात वाटप करण्यात येत आहे.

४० टक्के धान्य हे काळ्याबाजारात विक्रीसाठी पाठवले जात असून हे रोखण्यात अपुरे कर्मचारी, अधिकारी यांमुळे जिल्हा पुरवठा कार्यालय अयशस्वी होत आहे. अपुऱ्या मनुष्य बळामुळे ही परिस्थिती असल्याचे जिल्हापुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांनी सांगितले.

Web Title: Not only is the supply officer for Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.