चंद्रनगरला समृद्ध शाळा उपक्रमांचे नामांकन
By Admin | Updated: March 31, 2016 02:43 IST2016-03-31T02:43:18+5:302016-03-31T02:43:18+5:30
मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या बालकांचा गुणात्मक आणि शाळांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाकरीता राज्यभरातील ७२ जि.प.शाळांची

चंद्रनगरला समृद्ध शाळा उपक्रमांचे नामांकन
कासा : मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या बालकांचा गुणात्मक आणि शाळांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाकरीता राज्यभरातील ७२ जि.प.शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील जि.प.शाळा चंद्रनगर ता.डहाणू व जि.प.शाळा सावरपाडा ता.मोखाडा.या दोन शाळांची निवड झाली आहे.
सर्व बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षणात शाळांची कामगिरी व सुधारण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच हा शालेय सुधारणा केंद्रित सर्वकष व सर्वांगीण शालेय मूल्यांकन यंत्रणा समृद्ध शाळा (शाळासिद्धि) यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
या उपक्रमात निवडलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या निकषांवर आधारित प्रश्नावली स्वयंमूल्यमापन करून शासनाच्या शाळा सिद्धी या संकेत स्थळावर भरावयाची आहे. त्यानंतर न्युपा नवी दिल्ली या संस्थेचे निर्धारक शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यमापन करणार आहेत. यात सात क्षेत्रात एकूण ४५ मानके दिली आहेत,त्या मानकाची पूर्तता करण्यासाठी प्रत्येकी तीन स्तर दिलेले आहेत. जि.प.शाळा चंद्र्रनगर येथिल पदवीधर शिक्षक शैलेश राऊत यांनी पुणे येथिल यशदामधील दोन दिवसीय कार्यशाळेत माहिती कशी सादर करावी याचे मार्गदर्शन घेतले होते. त्यानुसार शाळेची माहिती समृद्ध शाळा या वेबसाईटवर भरण्यात आली होती. या माहितीचे मूल्याकन करण्यासाठी न्यूपा नवी दिल्ली येथील प्रतिनिधी भरत सूर्यवंशी व सतीश जाधव यांनी दि.२१ व २२ मार्च रोजी शाळेत भेट देऊन तपासणी करून आपला अहवाल पाठविला आहे.