शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

वसई-विरार महानगरपालिकेत अधिकारी तुपाशी तर इंजिनियर उपाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 00:29 IST

वसई विरार महानगरपालिकेत ठेका पद्धतीने नियुक्त असलेल्या बांधकाम, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागातील १२२ इंजिनियर्सना गेल्या दोन महिन्यापासून पगारच मिळालेला नाही.

नालासोपारा - वसई विरार महानगरपालिकेत ठेका पद्धतीने नियुक्त असलेल्या बांधकाम, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागातील १२२ इंजिनियर्सना गेल्या दोन महिन्यापासून पगारच मिळालेला नाही. महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना पगार मात्र इंजिनियरांना पगार नसल्याने अधिकारी तुपाशी तर इंजिनियर उपाशी अशी स्थिती आहे.वसई विरार महानगरपालिकेत कल्याण येथील विशाल एक्स्पर्टाईज याला बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत विभागात इंजिनियर पुरवण्याचा ठेका दिलेला असून विविध विभागात एकूण त्याने १२२ इंजिनियर पुरवले असून सध्या ते कार्यरत आहेत. याच ठेकेदाराला घरपट्टी विभागातील वसुली करण्याचाही ठेका दिल्याचेही कळते. जे इंजिनियर महानगरपालिकेला पुरवले आहेत ते स्थानिक रहिवासी असून त्यात काही जणांनी बीई केलेले आहे तर काहींनी डिप्लोमा केलेला आहे. दोघांनाही दुजाभाव न देता समान पगार दिला जात आहे. या इंजिनियरांचा २५ ते २५ तारखेप्रमाणे महिना पकडला जातो आणि ५ ते १० तारखेपर्यंत त्यांचा पगार होणे आवश्यक असते. पण मे आणि जून महिन्यांचा अद्याप पगार झालेला नाही तर एप्रिल महिन्याचा पगार १० दिवसांपूर्वी झाल्याचेही कळते. पगारासाठी इंजिनियरांना दर महिन्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होते. कामे तर जास्त प्रमाणात करून घेतली जातात, दम दिला जातो, चुकी झाली तर पगार कापला जाईल, अशी धमकी सुद्धा दिली जाते. मग पगार महानगरपालिका वेळेवर का करत नाही, असा सवाल काही इंजिनियरांनी उपस्थित केला आहे. महानगरपालिकेच्या अधिकारी, इंजिनियर व कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत सातवा वेतन आयोगसुद्धा लागू झालेला नसल्याचेही सूत्रांकडून कळते.कंत्राटदार विशाल एक्स्पर्टाइज यांची बिलेच महानगरपालिका वेळेवर पास करत नसल्याने आमचे पगार मिळत नसल्याची खंत काही इंजिनियरांनी व्यक्त केली आहे. तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी आस्थापना विभागाला आदेश दिला होता की, प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत पगार झालाच पाहिजे आणि तसा दर महिन्याला पगार होत होता. पण आता नवीन आलेले आयुक्त बळीराम पवार यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच पगार वेळेवर होत नसल्याचे इंजिनियर्संनी लोकमतला सांगितले आहे. महानगरपालिकेत शहर अभियंता माधव जवादे, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड आणि सहाय्यक अभियंता एकनाथ ठाकरे, आर.के.पाटील, सुरेंद्र ठाकरे, प्रदीप पाचंगे व प्रकाश साटम या सर्व अधिकाºयांचे पगार वेळेवर होत असून इंजिनियर्सचे पगार रखडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका उदयाला आली तेव्हापासून किंवा त्याआधी नगरपालिका होती त्यावेळेचे अनेक इंजिनियर सध्या महानगरपालिकेत कामावर आहेत पण त्यांना अद्यापपर्यंत सेवेत कायमस्वरूपी रुजू करून घेतलेले नाही.किती इंजिनियर असणे आवश्यक?राज्य शासनाच्या आदेशानव्ये आकृती बंधानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अंदाजे १६७ इंजिनियर असणे गरजेचे आहे. पण सध्या १२२ इंजिनियरांकडून महानगरपालिका विविध विभागातील कामे करवून घेते. महानगरपालिकेत इंजिनियरांची कमतरता असतानांही हे इंजिनियरांकडून भरमसाठी कामे करवून घेतली जातात पण पगार मात्र वेळेवर होतच नाही.पगाराची प्रक्रि या....आस्थापना विभाग इंजिनियरांचे काम केलेले दिवस मोजून ठेकेदाराला सांगतात व त्याप्रमाणे ठेकेदार बिले मनपाच्या आस्थापना विभागात जमा करतात. नंतर उपायुक्तांकडे बिले गेल्यावर ते तपासून अकाऊंट विभागाकडे पाठवल्यानंतर आॅडिट विभागात बिले तपासून त्याच्या चेकवर सही करण्यासाठी ती अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवली जातात. नंतर पगाराची रक्कम प्रत्येक इंजिनियरच्या खात्यावर आरटीजीएसने जमा होते.करोडो रु पयांचा कर जमा होतो मग...वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामधून घरपट्टी, पाणीपट्टी, बांधकाम व नगररचना विभागातून महिन्याकाठी करोडो रुपयांचा कर जमा केला जातो, अनधिकृत मोबाईल टॉवरकडूनही करोडो रु पयांचा कर जमा केला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात कराच्या रु पात पैसा महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा होतो. मग इंजिनियरांचा पगार वेळेवर का केला जात नाही?कसे काय पगार झाले नाही? मी बघतो आणि कळवतो. पगार होणे गरजेचे होते त्याबद्दल मला कोणीही काहीही बोलले नाही. - बळीराम पवार, आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार