शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रिक्षातून अतिरिक्त प्रवासी वाहतूक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:56 IST

पालघर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची माहिती; रस्त्यावरील पार्किंगवरही कारवाई होणार

पालघर : शहरातील विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेला ताळ्यावर आणण्यासाठी या पुढे तीन आणि सहा आसनी रिक्षांमधून अतिरिक्त प्रवासी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सात अधिकृत रिक्षा स्टॅण्डवर केवळ पाच रिक्षा ठेवण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी बैठकीत दिली.जिल्हा निर्मितीनंतर पाच वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पालघर शहरातील बेशिस्त बनत चाललेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे शहराला दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. जिल्हा निर्मितीनंतर तरी या समस्या कमी होतील, अशी आशा होती. मात्र, अतिक्रमण हटाव, रस्ते रुंदीकरण, सिग्नल व्यवस्था, वाहतूक पोलिसांचे नियंत्रण आदी वाहतूक नियंत्रणासाठी अत्यावश्यक बाबींकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अतिक्रमणाने रौद्ररूप धारण केले. यावर उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक, राज्य परिवहन (एस.टी.) विभाग, विद्युत वितरण, बांधकाम विभाग, रिक्षा-टेम्पो संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.शहरातील वाहतूक कोंडीला आळा घालण्याच्या दृष्टीने उपाय योजना म्हणून अधिकारी नाईक यांनी वाहतूक आराखड्याबाबत बनविलेला नकाशा बैठकीत सादर केला. यात एकेरी वाहतूक, अवजड वाहनांना बंदी, मच्छीमार्केटचे स्थलांतर, गाड्या पार्र्किंग व्यवस्था आदीबाबत उपस्थितांशी चर्चा केली. रिक्षाधारकाची संख्या १५०० पर्यंत पोहोचल्याने या बेछूट तर काही विनापरवाना वाढलेल्या रिक्षाधारकांना आवरण्याची तसदी कुठल्याही विभागाकडून घेतली जात नसल्याने शहरात फक्त सात रिक्षा स्टॅण्डवर पाच रिक्षा उभ्या ठेवण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे घोषित केले. या निर्णयावर काही रिक्षाधारकांच्या काही संघटनांनी आक्षेप घेतला. त्यावर आता तीन व सहा आसनी रिक्षांना दिलेल्या परवानगीपेक्षा अतिरिक्त प्रवासी बसवता येणार नाही, असे सांगून त्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याची घोषणा केली. मात्र शहरातील कोंडीला जास्त प्रमाणात कारणीभूत असलेल्या रिक्षाधारकांकडून पुरविल्या जाणाºया आर्थिक रसदीमुळे हा कारवाईचा बडगा किती काळ टिकून राहतो, हे दिसणार आहे. रस्त्यारस्त्यावर खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, फळ-भाजी विक्रेत्यांच्या गाड्या, दुचाकी - चार चाकी गाड्यांच्या रस्त्यावरील पार्र्किं ग यामुळेही शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याने यांच्या विरोधातील कारवाई किती काळ टिकून राहते यावर वाहतूक कोंडीच्या समस्यांचे फलित ठरणार आहे. यावेळी नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत उपस्थित होते.पालघरमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या मच्छी विक्र ेत्या व भाजीविक्रेत्यासाठी पालघर पूर्व भागात व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे मनोर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार असून त्यामुळे रस्ता मोकळा होणार असून पालघरवासियांनी आम्हाला सहकार्य करावे. - सुभाष पाटील,बांधकाम सभापती