नितीन म्हात्रे कोकण प्रतिष्ठान श्रीचा मानकरी

By Admin | Updated: April 1, 2017 05:15 IST2017-04-01T05:15:37+5:302017-04-01T05:15:37+5:30

पालघर जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशन आणि कोकण प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कोकण श्रीचा मानकरी पॉवर

Nitin Mhatre Konkan Pratishthan Shri Manchari | नितीन म्हात्रे कोकण प्रतिष्ठान श्रीचा मानकरी

नितीन म्हात्रे कोकण प्रतिष्ठान श्रीचा मानकरी

वसई : पालघर जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशन आणि कोकण प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कोकण श्रीचा मानकरी पॉवर झोनचा नितीन म्हात्रे ठरला.
नालासोपाऱ्यातील हेडगेवार चौकात ही स्पर्धा पार पडली. एकूण पाच गटात झालेल्या स्पर्धेतील ५५ किलो गटात परब फिटनेसच्या संदेश सकपाळ, ६० किलो गटात पॉवर झोनच्या नितीन म्हात्रे, ६५ किलोच्या गटात आरएम भट्टच्या उमेश पांचाळ, ७० किलो गटात बॉडी वर्कशॉपच्या विलास घडावले आणि मोठ्या गटात रसूल दिब्रिटो यांनी बाजी मारली. त्यानंतर या पाच विजेत्यांमध्ये अंतिम लढत झाली.
त्यात नितीन म्हात्रेने बाजी मारली. तर अभिषेक खेडेकरने बेस्ट पोझरचे पारितोषिक पटकावले.
भारती श्रीचा किताब पटकावलेले नालासोपाऱ्याचे सुपुत्र कै. सहदेव नेवाळकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण मुळीक, स्वप्नील नेवाळकर, पालघर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिपंकर पाटील, चाणक्य नगरी फेडरेशनचे अध्यक्ष नितीन पेंढारी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यात विशेषत: तरुणाईचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. यापुढेही अशाच स्पर्धांचे आयोजन व्हावे अशी भावना रसिक व्यक्त करीत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Nitin Mhatre Konkan Pratishthan Shri Manchari