निकुळे कुटुंबाला घरकुल जाहीर
By Admin | Updated: March 19, 2016 00:07 IST2016-03-19T00:07:15+5:302016-03-19T00:07:15+5:30
आपटाळे येथील सुरेश निकु ळे या कातकरी गृहस्थाने आर्थिक विवंचनेतून आग लाऊन स्वत:चे आयुष्य संपविले. घरातील कर्ता पुरुषाच्या जाण्याने उघड्यावर पडलेल्या या कुटूंबाला आदिवासी

निकुळे कुटुंबाला घरकुल जाहीर
जव्हार : आपटाळे येथील सुरेश निकु ळे या कातकरी गृहस्थाने आर्थिक विवंचनेतून आग लाऊन स्वत:चे आयुष्य संपविले. घरातील कर्ता पुरुषाच्या जाण्याने उघड्यावर पडलेल्या या कुटूंबाला आदिवासी प्रकल्प विभागाने आधार देत तातडीने घरकूल मंजूर केले असून पिडीत कुटूंबातील चौथीच्या वर्गातील मुलाला नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश देणार असल्याचे प्रकल्प अधिकारी बाबासाहेब पारधी यांनी लोकमतला सांगितले.
चार दिवसानंतरही या घटनेची साधी नोंदही न घेणाऱ्या प्रशासनाला लोकमतने धारेवर धरल्यानंतर आदिवासी प्रकल्प विभागाने तातडीने पावले उचलून या कुटूंंबाची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. आदिवासी विकास विभागामार्फत आदिम जमातीला प्राधन्य देण्याचे परीपत्रक असल्यामुळे त्यांना प्राधान्याने घरकुल देण्याचे जाहीर केले, तसेच सुरेशचा मुलगा निलेश इ. ४थी ला आहे, त्याला इ. ५ वी ला इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांत प्रेवश देण्याकरीता अर्ज जमा करण्यात आलेले असून प्रथम प्राधान्य देऊन प्रवेश निश्चित केले जाईल तसेच सुरेशची पत्नी वंदनाला न्युक्लिीअस बजेट योजनेतून शिवण प्रशिक्षण देऊन शिलाई मशीन वाटप करण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी पारधे यांनी सांगितले.
या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्याकरीता सहा. प्रकल्प
अधिकारी प्रदिप देसाई आणि लेखा अधिकारी ग. ना. पाटील यांनी
पिडीत कुंटूंबीयांकडून लागणारे कागदपत्रे जमा केले असून तातडीने
या सर्व योजनांचा लाभ निकुळे कुटूंबाला दिला जाईल अशी माहिती पारधे यांनी पत्रकारांना दिली. (वार्ताहर)