नवनियुक्त पालघर जिल्हाधिकारी माणिक जी गुरसळ तातडीने रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 23:13 IST2020-09-02T23:13:09+5:302020-09-02T23:13:14+5:30
मुंबई शुल्क नियामक प्राधिकरण विभागाचे सचिव माणिक जी गुरसळ (भा प्र सेवा ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनियुक्त पालघर जिल्हाधिकारी माणिक जी गुरसळ तातडीने रुजू
वसई : आज बुधवारी राज्यशासनाने विद्यमान पालघर जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांची तातडीने मुदतपूर्व बदलीचे आदेश पारित केले. त्यांच्या जागी मुंबई शुल्क नियामक प्राधिकरण विभागाचे सचिव माणिक जी गुरसळ (भा प्र सेवा ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान नवनियुक्त जिल्हाधिकारी पालघर गुरसळ यांनी संध्याकाळी पालघर जिल्हाधिकारी मुख्यालयात रुजू होऊन तातडीने आपला पदभार स्वीकारला असून जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी किरण महाजन यांच्या समवेत इतर महसूल अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि जिल्हाधिकारी गुरसळ यांनी पदभार स्वीकारला.