नवीन अंबाडी पुलाच्या रस्त्याला भगदाड, दुचाकीस्वारांना दुखापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:04 IST2019-05-31T23:04:23+5:302019-05-31T23:04:41+5:30

महापालिकेच्या नवघर माणिकपूर कार्यालयाच्या एच प्रभागाचे बांधकाम अभियंता आर.के.पाटील यांना तत्काळ हे भगदाड बुजवण्याची सूचना केली, जेणेंकडून इतर अपघात होणार नाहीत.

New Yamaha bridge hamper on road, gap between two wheelers | नवीन अंबाडी पुलाच्या रस्त्याला भगदाड, दुचाकीस्वारांना दुखापत

नवीन अंबाडी पुलाच्या रस्त्याला भगदाड, दुचाकीस्वारांना दुखापत

वसई : वसईच्या नवघर माणिकपूर शहराच्या एच प्रभागा अंतर्गत अंबाडी रोड या नवीन उड्डाणपुलाला मधोमध भगदाड पडल्याने दोघा दुचाकी चालकांना दुखापत झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली या संदर्भात वसई वाहतूक पोलीस निरीक्षक संपत पाटील यांना मुख्य रस्त्याच्या मधोमध भगदाड पडून दोघांना अपघात झाल्याची माहिती समजताच त्यांनी महापालिकेच्या नवघर माणिकपूर कार्यालयाच्या एच प्रभागाचे बांधकाम अभियंता आर.के.पाटील यांना तत्काळ हे भगदाड बुजवण्याची सूचना केली, जेणेंकडून इतर अपघात होणार नाहीत.

दरम्यान अंबाडी रोड येथील हा नवीन उड्डाणपूल तीन वर्षापूवीच वाहतुकीसाठी सुरु झाला असून त्याच्या खालून शहरातील पाणीपुवठा विभागाची मोठी जलवाहिनी व तिचे रस्त्याच्या मधोमध व्हॉल्व्ह पॉईंट असल्याने त्याठिकाणी रोजच्या रहदारीमुळे भगदाड पडून ते मोठे झाल्याची माहिती महापालिकेने दिली. या भगदाडाची तातडीने दुरु स्ती करीत असल्याचे नवघरचे सहायक आयुक्त गिलसंन घोंनसालवीस यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: New Yamaha bridge hamper on road, gap between two wheelers