शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

जिल्ह्यात आता नवी राजकीय समीकरणे आली उदयास; भाजप बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:53 PM

सामाजिक क्षेत्रातील जिजाऊची राजकारणात एंण्ट्री

रवींद्र साळवे मोखाडा : पालघर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करा, असे आवाहन प्रचारादरम्यान सेना-राष्ट्रवादीचे नेते मंडळी करत होते. या आवाहनाला जणू लोकांनी प्रतिसाद दिला आणि जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा धुव्वा उडाला. यामुळे जिल्हा परिषदेतील नंबर १ चा पक्ष नंबर ३ वर गेला. या वेळी जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण उदयास आले. यानुसार सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जिजाऊची राजकारणात एंट्री झाली.

राष्ट्रवादीची सरशी झाली. यातून भाजपचा बालेकिल्ला एकदम ढासळला. यामुळे भाजप जिल्ह्यात बॅकफूटवर गेला आहेच, त्याचबरोबर जिल्ह्यात सध्या लोकसभा, विधानसभा आणि जि.प.तूनही भाजप हद्दपार झाल्याचे चित्र आहे. विक्रमगड नगरपंचायतीमध्ये जिजाऊने काँग्रेससोबत निवडणूक लढवून नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवले. या वेळी एका सदस्याची गरज असताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. या वेळीच खरे तर भविष्यातील सांबरे-भुसारा एकत्रीकरणाची नांदी ठरली होती. त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत झाली. जिजाऊ आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित येऊन भाजपचा धुव्वा उडवत राष्ट्रवादी जिल्ह्यात नंबर २ चा पक्ष ठरला आहे.

विक्रमगड विधानसभा म्हणजे भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र या वेळी लोकसभेला महाआघाडीने भाजपपेक्षा जास्त मते मिळवली होती, तर विधानसभेत २१ हजारांच्या मताधिक्क्याने भाजपला हरवत सुनील भुसारा आमदार झाले. तेव्हाच खरे तर भाजपची पीछेहाट होत होती. भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपला शह देण्यासाठी नीलेश सांबरे यांची जिजाऊ आणि आमदार सुनील भुसारा यांची चाणक्यनीती कामी आली. जर जिजाऊ स्वबळावर आणि राष्ट्रवादीही स्वतंत्र लढली असती तर मात्र चित्र वेगळे असते. यामुळे भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी-जिजाऊ एकत्र आली आणि ही खेळी यशस्वीही ठरली. या सगळ्यात भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा विक्रमगड तालुका लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांत ढासळला. यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने घडली, ती म्हणजे पालघर पर्यायाने कोकणात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली ही संस्था आता राजकारणात आली आहे.संघटनेचा प्रभावजिजाऊ संघटनेची आता नव्या दमात राजकारणात एंट्री झालेली आहे. जिल्ह्यातील येणाºया सर्व निवडणुकांत संघटनेचा प्रभाव राहील, अशी स्थिती असल्याने सर्वच राजकीय पक्षांना आता जिजाऊची दखल घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :BJPभाजपा