शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

पालघर स्थानकाबाहेर पुन्हा फडकला राष्ट्रध्वज; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 1:59 AM

आ. वणगा यांनी ३० नोव्हेंबरच्या आत ध्वज पुन्हा न लावल्यास सेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिल्याबरोबर रेल्वे प्रशासन हलले आणि तिरंगा डौलाने फडकला.

पालघर : पालघर रेल्वे स्थानकासमोर वर्षभरापूर्वी डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज अचानक काढून टाकण्यात आल्यावर तो पुन्हा लावण्याच्या विनंतीला रेल्वे प्रशासन दाद देत नसल्याने आमदार श्रीनिवास वणगा आणि डहाणू-वैतरणा सेवाभावी संस्थेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने नमते घेतल्याने येथे पुन्हा राष्ट्रध्वज डौलाने फडकू लागला आहे.

भारतीय रेल्वेतर्फे देशातील प्रमुख आणि महत्त्वांच्या रेल्वे स्थानकांवर ३०×२० फुटांचे आणि १०० फूट उंचीवर राष्ट्रध्वज लावण्याच्या आदेशान्वये पालघर स्थानकासमोर वर्षभरापूर्वी ध्वज फडकविण्यात आला होता. याचे जोरदार स्वागत पालघरवासीयांनी केले होते. परंतु कुठलेही ठोस कारण न देता प्रशासनाने विविध तांत्रिक अडचणी सांगून ऑगस्ट महिन्यापासून हा राष्ट्रध्वज काढून टाकला होता.प्रवाशांनी आणि प्रवासी संघटनांनी वेळोवेळी पाठपुरावा करून मुद्दा उचलून धरला. पण निर्ढावलेल्या रेल्वे प्रशासनाने थातूरमातूर उत्तरे देऊन वेळकाढूपणा सुरू केल्याचे आणि आश्वासनांची खैरात केल्याचा अनुभव संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनाची भेट घेताना आल्याचे सांगितले. ही बाब संघटनेने आमदार वणगा, जिल्हाध्यक्ष राजेश शहा यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी पालघर अधीक्षकांची भेट घेतल्यावर लवकरच राष्ट्रध्वज लावून देण्याचे आश्वासन पुन्हा दिले. आ. वणगा यांनी ३० नोव्हेंबरच्या आत ध्वज पुन्हा न लावल्यास सेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिल्याबरोबर रेल्वे प्रशासन हलले आणि तिरंगा डौलाने फडकला.