नालासोपाऱ्यात तिघांवर चाकू, कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 11:58 AM2021-05-13T11:58:52+5:302021-05-13T11:59:29+5:30

संतोष भवनच्या दुबे लक्ष्मी चाळीत राहणारा मंगेश विश्वकर्मा (२६) हा त्याचा भाऊ रितेश व मित्र रामेश्वर हे तिघे ७ मेला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी आरोपी दीपू पाल याच्याकडे सोमवारी संध्याकाळी संतोष भवन येथील कारगिल नगरच्या रिक्षास्टँडजवळ गेले.

In Nalasopara, three were stabbed by knife | नालासोपाऱ्यात तिघांवर चाकू, कोयत्याने वार

नालासोपाऱ्यात तिघांवर चाकू, कोयत्याने वार

googlenewsNext


नालासोपारा : मारहाणीचा जाब विचाण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांवर चाकू, कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी संतोष भवनच्या कारगिल नगर रिक्षास्टँडजवळ घडली. तिन्ही जखमी तरुणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून, त्यांचा जाबजवाब आल्यावर तुळींज पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

संतोष भवनच्या दुबे लक्ष्मी चाळीत राहणारा मंगेश विश्वकर्मा (२६) हा त्याचा भाऊ रितेश व मित्र रामेश्वर हे तिघे ७ मेला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी आरोपी दीपू पाल याच्याकडे सोमवारी संध्याकाळी संतोष भवन येथील कारगिल नगरच्या रिक्षास्टँडजवळ गेले. आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमवून मंगेशवर कोयत्याने डाव्या हातावर, उजव्या पायावर वार केले. त्याचा मित्र रामेश्वर याच्यावर चाकूने उजव्या हाताच्या दंडावर वार केले. तर त्याचा भाऊ रितेश याच्यावर आरोपी अमन याने उजव्या हाताच्या खांद्यावर, हाताच्या कोपरावर वार करून गंभीर जखमी केले. आरोपी रवी, इरफान, बाबू बिहारी या तिघांनी ठोशाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत दमदाटी केली.
 

Web Title: In Nalasopara, three were stabbed by knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.