शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Nalasopara: सावत्र आईने दोन अल्पवयीन मुलांना दिले चाकूने चटके, वालीवच्या फादरवाडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 13:57 IST

Nalasopara Crime News: एका सावत्र आईनेच ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर तर ८ वर्षाच्या मुलाच्या हातावर चाकूने चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर घटना ही वालीवच्या फादरवाडी परिसरात घडली आहे.

- मंगेश कराळे नालासोपारा - एका सावत्र आईनेच ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर तर ८ वर्षाच्या मुलाच्या हातावर चाकूने चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर घटना ही वालीवच्या फादरवाडी परिसरात घडली आहे. दोन्ही मुलांच्या वडिलांनी गुरुवारी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

फादरवाडीच्या सनशाईन ग्रीन पार्क बिल्डिंग नंबर १ मध्ये नागनाथ सावसगळी (३२) हे दुसरी पत्नी नेहा आणि पहिल्या पत्नीपासूनचे ८ आणि ७ वर्षांच्या दोन्ही मुलांसह राहतात. नागनाथ यांचे पहिल्या पत्नीपासून सोडचिट्ठी झाल्यापासून दोन्ही मुलांचे पालन पोषण व सांभाळ ते करतात. जून महिन्यात वेळोवेळी आरोपी सावत्र आई नेहा हिने ८ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात घरातील पकडीने मारहाण व हातावर गरम चाकूने चटके देऊन तर दुसऱ्या ७ वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगवर गरम चाकूने चटके देवून पोळी बनविण्याचे लाकडी लाटण्याने त्याचे डावे हाताचे कोपरावर व उजवे कानाखाली मारून जखमी केले. तसेच दोघांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देत घरातील फरशी पुसणे, झाडू मारणे व भांडी घासण्याचे काम करून घेतले. सदर प्रकाराबाबत वडिलांना काही सांगितले तर आणखीन मारहाण करण्याची धमकी सुद्धा सावत्र आईने दोन्ही मुलांना दिली होती. दोन्ही मुलांच्या वडिलांनी गुरुवारी संध्याकाळी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन मुलांची काळजी व संरक्षण कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी तक्रार आल्यावर सावत्र आईवर गुन्हा दाखल केला आहे. तिने एका मुलाच्या हातावर आणि दुसऱ्या मुलाच्या गुप्तांगावर गरम चाकूने चटके देऊन मारहाण केली आहे. आरोपी आईला शुक्रवारी पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी व तपास करणार आहे.- जयराज रणवरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारFamilyपरिवार