शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Nalasopara: सोनसाखळी चोरी करणा­या सराईत आरोपीला अटक, ७ गुन्हयांची उकल करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 19:18 IST

Crime News: गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या टीमने सराईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या ईराणी आरोपीला पकडले आहे.

- मंगेश कराळेनालासोपारा - गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या टीमने सराईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या ईराणी आरोपीला पकडले आहे. त्याच्याकडून ७ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाल्याची माहिती गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

वसईच्या बंगली रोडवरील रो हाऊस नंबर ५, शक्ती विलाज येथे राहणाऱ्या किरण अशोक मगिया (६२) या सुनेबरोबर दुचाकीवरून १० फेब्रुवारीला राहते घरातुन जैन मंदिर या ठिकाणी कार्यक्रमासाठी जात पहाटे ६ वाजता जात होत्या. माणिकपूर नाका शाओमी एमआयचे शोरुम समोर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातून सोन्याची चैन जबरीने खेचून पळून गेले. माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयाचे हद्दिमध्ये सतत होणा-या चैन स्नॅचिंग गुन्हयांना आळा घालणेबाबत व घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी व अंमलदार यांनीे घडणा­या प्रत्येक चैन स्नॅचिंग गुन्हयाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे परिक्षण केले होते. चैन स्नॅचिंग गुन्हयातील आरोपीत याचे फुटेज परिक्षण व गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त महितीच्या आधारे आरोपी अब्बास अमजद ईराणी (२४) यास निष्पन्न करुन आरोपीत हा आंबिवली ईराणी वस्तीतील रहीवासी आहे. यापुर्वी ईराणी वस्तीमध्ये आरोपीत पकडणेस गेलेल्या तपास पथकावर हल्ला होण्याच्या ब-याच घटना घडलेल्या असतानाही सर्व बाबींची योग्य सांगड घालुन सापळा करवाई करुन कोणताही कायदा व सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण होणारी कोणतीही घटना न घडू देता त्याला ४ एप्रिलला ताब्यात घेण्यात आले. अटक आरोपीकडून तपासादरम्यान चैन स्नॅचिंगचे ७ गुन्हे उघडकीस आणुन चोरी करणेकरीता वापरलेल्या दुचाकीसह गुन्हयात चोरीस गेलेले ८७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण ३ लाख ३१ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपीत याचे विरोधात संघटीत गुन्हेगारीचे २ गुन्हे, जबरी चोरीसह दुखापतीचे २१ गंभीर गुन्हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, मंगेश चव्हाण, संजय किसन नवले, पोलीस हवालदार चंदन मोरे, महेश पागधरे, सचिन पाटील, जगदिश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांत ठाकुर, अमोल कोरे, बापु पवार, राजेश पद्मने, महेंद्र शेट्ये, संतोष चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी