नालासोपाऱ्याचा इकरार दुबईतून दोन वर्षे बेपत्ता
By Admin | Updated: February 14, 2017 02:35 IST2017-02-14T02:35:21+5:302017-02-14T02:35:21+5:30
दुबईत नोकरीसाठी गेलेला नालासोपारा येथील इकरार खान हा गेल्या दोन महिन्यांपासून गूढरित्या बेपत्ता झाला आहे. त्याच्या शोधासाठी त्याची

नालासोपाऱ्याचा इकरार दुबईतून दोन वर्षे बेपत्ता
पारोळ: दुबईत नोकरीसाठी गेलेला नालासोपारा येथील इकरार खान हा गेल्या दोन महिन्यांपासून गूढरित्या बेपत्ता झाला आहे. त्याच्या शोधासाठी त्याची बहीण हाजरा शेख हिने जंगजंग पछाडले. परंतु अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. तो उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रहात होता. तिने दिलेल्या माहितीनुसार तो २०११ मध्ये दुबईला गेला व २०१३ मध्ये तो परत आला. २०१४ मध्ये त्याने लग्न केलं. दीड महिना झाल्यावर तो पुन्हा दुबईतील सल्तनत ओमान या कंपनीत एसी टेक्निशियनची नोकरी करू लागला.तो सोशल मिडियाद्वारे तो बहिणीच्या नियमित संपर्कात होता. गेल्या २० डिसेंबरला तो तिथल्या इबरी मार्केट मध्ये गेला आणि घरच्यांना सांगितले कि मी तुम्हाला थोड्याच वेळात पैसे पाठवतो भारतीय वेळे नुसार तेव्हा दुपारचा दीड वाजला होता. त्यानंतर त्याचा फोन स्वीच्ड आॅफ झाला. तेव्हापासून त्याच्याशी संपर्क झालेला नाही. त्याच्या नातेवाईकांनी उत्तरप्रदेश मधून ,मस्कत, ओमानच्या दूतावासात ३ वेळा तक्रार केली तसेच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही पत्रव्यवहार केला मात्र त्यांना अद्याप कुठूनही उत्तर आले नाही २५ जानेवारी २०१७ ला इकरारच्या नातेवाईकांना पाकिस्तानी इसमाचा फोन आला की इकरार पाकिस्तानच्या तुरूंगात आहे. मात्र त्याने तो कोणत्या तुरूगांत आहे हे सांगितले नाही.
तो अरबी भाषेत बोलल्याने इकरार नेमका कुठे आहे नेमकं काय झालं ते समजलं नाही. या नंतर कुटुंबियांची काळजी अधिकच वाढली आहे. त्याचे अपहरण झालं असण्याची शक्यता तिने व्यक्त केली आहे. ज्या कंपनीत इकरार काम करायचा त्यांनी देखील हात वर केले आहेत. याबाबत मी पंतप्रधानांना लक्ष घालून भावाला शोधण्याची विनंती केल्याचे हाजराने सांगितलं. तो येथे त्याची पत्नी अंजुम आणि आई वडिलांसह रहात होता. त्याला कुठलही वाईट संगत नव्हती तसेच तो कुठल्याही संघटनेशी संबंधित नव्हता असे त्याच्या बहिणीने सांगितले. (वार्ताहर)