पावणेतीन कोटींच्या करारावर माझी सही बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:54 PM2018-10-21T23:54:38+5:302018-10-21T23:54:45+5:30

माझी सही बोगस असल्याचा आरोप खुद्द बांधकाम सभापती अतुल पाठक यांनीच सभेत केल्याने नगरपरिषदेवर होणाऱ्या गैरव्यवहाराच्या आरोपात काही अंशी तथ्यता असल्याचे दिसून आले आहे.

My perfect bogus on the contract of Rs | पावणेतीन कोटींच्या करारावर माझी सही बोगस

पावणेतीन कोटींच्या करारावर माझी सही बोगस

Next

पालघर : पालघर नगर परिषद अंतर्गत हुतात्मा स्तंभ ते वळण नाका या २ कोटी ८८ लाख ७९ हजार ४६५ खर्चाच्या रस्त्याच्या निविदेच्या कारारपत्रावर असलेली माझी सही बोगस असल्याचा आरोप खुद्द बांधकाम सभापती अतुल पाठक यांनीच सभेत केल्याने नगरपरिषदेवर होणाऱ्या गैरव्यवहाराच्या आरोपात काही अंशी तथ्यता असल्याचे दिसून आले आहे.
पालघर हुतात्मा स्तंभ ते वळण नाका रस्त्याच्या कामाची निविदा मार्च मध्ये काढण्यात आली होती. मात्र या कामाच्या संदर्भात पुरेशा निविदा आल्या नसल्याचे कारण देऊन पुन्हा एप्रिल महिन्यात २ कोटी ८८ लाख ७९ हजार ४६५ रुपये खर्चाच्या १५ मीटर रुंद तर १ हजार ८०० मीटर्स लांबीच्या रस्त्याची फेरनिविदा काढण्यात आली. मात्र निवडणुकांची आचारसंहिता लागल्याने या रस्त्याचे काम थांबून राहिले होते. आॅगस्ट महिन्यात पुन्हा ह्या कामाच्या आलेल्या निविदा उघडण्यात आल्या नंतर कामाचे ठेकेदार आणि बांधकाम सभापती व इतरांच्या सह्यांची आवश्यकता निर्माण झाली आणि सर्वांच्या सह्या झाल्याचे सांगून रस्त्यांचा हा ठेका मंजूर होऊन कामाला सुरुवातही झाली.
पालघर नगरपरिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरपरिषद आणि ठेकेदार याच्या मध्ये झालेल्या या रस्त्याच्या निविदेच्या कराराचा विषय उपस्थित झाला. त्यावर जोरदार चर्चा झाली. या करारपत्रावर बांधकाम सभापती अतुल पाठक, स्थायी समिती सदस्य उत्तम घरत यांच्या सह्या असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. मात्र असल्या कुठल्याही कागदपत्रांवर आपण सही केली नसल्याचे त्यांनी सांगितल्याने नगरपरिषदेतील कारभाराचे पितळ सर्वांसमोर उघडे पडले. या दरम्यान कारारपत्राची मूळ प्रत सभागृहासमोर मागविण्यात आल्या नंतर करारपत्रातील माझ्या नावासमोरील सही माझी नसल्याचे सभापती अतुल पथक यांनी भर सभागृहात सर्वांसमक्ष सांगितल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे माझी सही अन्य व्यक्तीने बनावट पद्धतीने केली असल्याचे सांगून चौकशीची मागणी केली. यावेळी नगरपरिषदेतील उपलब्ध कागदपत्रांवर सभापती पाठक ह्यांच्या सह्या आणि करारपत्रकावरील सह्यांची पडताळणी करण्यात आल्यावर करार पत्रकावर करण्यात आलेली सही बनावट असल्याचे स्पष्ट झाले. नगर पालिकेत सत्ताधाºयांच्या गटातील राजकारण शहराचा विकास रोखू पहात असून नगराध्यक्ष उत्तम पिंपळे विरुद्ध उत्तम घरत, अतुल पाठक ह्यांचे विरोधातील विकास कामांचा निधी, योजनांची अंमलबजावणी बाबतचे द्वंद्व नगरपरिषदेतील अनेक सभामध्ये पहावयास मिळालेले आहे. येत्या मार्च महिन्यात नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून आर्थिक गणिताच्या जोरावर आम्ही कसेही निवडून येऊ शकतो या काही नगरसेवकांच्या मानसिकतेला धक्का देण्याचे काम या निवडणुकीत आम्ही करणार असल्याचा इशारा जागरुक मतदार आतापासूनच देत आहेत.
>पालिकेच्या सर्वसाधारण सभेतच झालेल्या आरोपाने खळबळ
या करार पत्रावरील सह्या या सभापती आणि सदस्याच्या असून या कामात कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही.
- उत्तम पिंपळे, नगराध्यक्ष.
ठेकेदाराकडून मिळणाºया टक्केवारीत अनेक गणिते अडकली असून नगरपरिषदेतील नगरसेवकांची मिली-जुली आहे.
-अरु ण माने, माजी नगरसेवक.

Web Title: My perfect bogus on the contract of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.