मूकबधिर विद्यार्थ्यांनीही लुटली पाळण्यांची मौज
By Admin | Updated: October 8, 2015 23:13 IST2015-10-08T23:13:03+5:302015-10-08T23:13:03+5:30
अवलिया पीर शहा सदरोद्दीन बदरूद्दीन चिश्ती (र.अ.) यांच्या ५६३ व्या उरूसा निमित्त बबला शेख, ईशाद शेख, शकील शेख, रवींद्र पोटींदा, मन्नान सैय्यद, शमीम काझी, राजेश मुलगीर, ईशाद

मूकबधिर विद्यार्थ्यांनीही लुटली पाळण्यांची मौज
जव्हार: अवलिया पीर शहा सदरोद्दीन बदरूद्दीन चिश्ती (र.अ.) यांच्या ५६३ व्या उरूसा निमित्त बबला शेख, ईशाद शेख, शकील शेख, रवींद्र पोटींदा, मन्नान सैय्यद, शमीम काझी, राजेश मुलगीर, ईशाद फरास, समीर शेख, पापा शेख, साहील मेमन, जावेद खान, ईमतियाज शेख, फिरदोन खान, व त्यांचे सहकारी यांनी येथील दिव्य विद्यालयातील ३०० मूक-बधीर विद्यार्थ्यांना वेगवेगळ््या पाळण्यांची मोफत सैर घडवली. या उपक्रमाचे कौतुक दिव्य विद्यालयाच्या अध्यक्षा प्रमिला कोकड यांनी केले.
प्रत्येकी ४० रू तिकीट असलेल्या पाळण्याची सैर यासर्व मुलांना घडविणे हे त्यांच्या मूकबधीरतेमुळे अत्यंत अवघड होते. परंतु, बबला शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अवघड कामगिरी मायेच्या ममतेने पार पाडली. या वेळी पालिकेने मैदानाची सफाई करून दिली तर महावितरनणे विद्युत पुरवठा अखंड ठेवला. (वार्ताहर)