शरीरसंबंधाला नकार दिल्याने कुऱ्हाडीने हत्या

By Admin | Updated: September 4, 2016 03:23 IST2016-09-04T03:23:43+5:302016-09-04T03:23:43+5:30

शरीरसंबंधास नकार देणाऱ्या मित्राच्या प्रेयसीची एका कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची खळबळजनक बाब उजेडात आली आहे. विरार पश्चिमेच्या जकात नाका येथे शुक्रवारी दुपारी

Murder by Kurhadi by refusing body corpus | शरीरसंबंधाला नकार दिल्याने कुऱ्हाडीने हत्या

शरीरसंबंधाला नकार दिल्याने कुऱ्हाडीने हत्या

विरार : शरीरसंबंधास नकार देणाऱ्या मित्राच्या प्रेयसीची एका कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची खळबळजनक बाब उजेडात आली आहे. विरार पश्चिमेच्या जकात नाका येथे शुक्रवारी दुपारी ऐश्वर्या अग्रवाल (१९) हिची दीपक वाघरी याने आपल्या घरात हत्या केली होती. हत्येनंतर दीपकला अटक करण्यात आली आहे.
अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या ऐश्वर्या अग्रवालचे सोहेल शेख या तरुणाशी प्रेमसंबंध होते. सोहेलचा मित्र असलेल्या दीपक वाघरी याच्या विरार पश्चिमेकडील जकातनाका येथील घरात ऐश्वर्या आणि सोहेल भेटत असत. शुक्रवारी दुपारी ऐश्वर्या नेहमीप्रमाणे सोहेलला भेटण्यासाठी दीपकच्या घरी आली होती. त्या वेळी दीपक घरी एकटाच होता. तसेच सोहेलला यायला उशिरा झाला होता.
तिला एकटी पाहून दीपकच्या मनात वासना जागृत झाली. त्याने तिच्याकडे थेट तिने नकार देत तीव्र विरोध करून आरडाओरडा केला असता घाबरलेल्या दीपकने घरातील कुऱ्हाडीने ऐश्वर्यावर सपासप वार केले. त्यात ऐश्वर्या जागीच ठार झाली. (वार्ताहर)

Web Title: Murder by Kurhadi by refusing body corpus