पालिका लोगो झाला हायजॅक
By Admin | Updated: September 22, 2015 03:34 IST2015-09-22T03:34:01+5:302015-09-22T03:34:01+5:30
मीरा-भार्इंदर पालिकेने गेल्या २४ वर्षांपासून स्वत:जवळ अनौपचारिकपणे बाळगलेला लोगो हायजॅक झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले असतानाच संतप्त

पालिका लोगो झाला हायजॅक
भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेने गेल्या २४ वर्षांपासून स्वत:जवळ अनौपचारिकपणे बाळगलेला लोगो हायजॅक झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले असतानाच संतप्त शिवसेना व मनसेने पालिकेला एका आठवड्यात निर्णय घेण्याचे अल्टिमेटम दिले असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
लोकमतनेदेखील यावर सतत वृत्तांकन करून त्याच्या हायजॅकची कल्पना प्रशासनाला करून दिली होती. परंतु, त्यावर गंभीर नसलेल्या कामचुकार प्रशासनाने अखेर लोगो हातचा गमावला असून त्याची नोंदणी भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीने अलीकडेच करून घेतली आहे. ही बाब लोकमतने २१ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या वृत्तातून उजेडात आणल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच स्थानिक राजकीय मंडळींतदेखील त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
याबाबत, आ. प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, असा प्रकार निंदनीय असून पालिकेचा घटक असलेल्यांकडून अशी अपेक्षा नाही. भविष्यात पालिकासुद्धा खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने एका आठवड्यात लोगोचा निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल. तर, मनसे उपाध्यक्ष अरुण कदम यांनी सांगितले की, गेल्या २४ वर्षांत लोगो नोंदणीकृत न करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्याचा खुलासा प्रशासनाने जनतेसमोर करावा.