तलासरीत सर्वत्र बहुरंगी लढती

By Admin | Updated: November 9, 2016 03:29 IST2016-11-09T03:29:54+5:302016-11-09T03:29:54+5:30

या नगर पंचायतीच्या निवडणुकी साठी माकपा, भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना यांनी कंबर कसली असली तरी खरी लढत माकपा व भाजपातच होणार आहे

Multicultural battles everywhere | तलासरीत सर्वत्र बहुरंगी लढती

तलासरीत सर्वत्र बहुरंगी लढती

सुरेश काटे , तलासरी
या नगर पंचायतीच्या निवडणुकी साठी माकपा, भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना यांनी कंबर कसली असली तरी खरी लढत माकपा व भाजपातच होणार आहे
तलासरीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व असले तरी भाजपाची ही ताकत आता तलासरीत वाढत आहे. तर राष्ट्रवादी पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे नगर पंचायत अगोदर असलेल्या तलासरी ग्रामपंचायती मध्ये माकपचे नऊ, भाजपचे पाच, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार निवडून आले होते. या वॉर्डातील आपल्या जागा टिकवून अधिक जागा मिळविण्याचा प्रयत्न सर्वांकडून होत आहे तर शिवसेनेने सात ठिकाणी उमेदवार उभे करून आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपा-शिवसेनेची युती व काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे परंतु तलासरीत हे सर्व स्वबळावर लढत आहेत तलासरीत शिवसेना व काँग्रेसची ताकत नसल्याने कदाचित त्यांच्या मित्र पक्षांनी त्यांना बाजूला काढले असावे त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना बळ नसतांना तलासरीत स्वबळावर लढत आहेत. तलासरी नगर पंचायतीच्या सतरा वॉर्डासाठी निवडणूक होत असून ५८ उमेदवार रिंगणात आहेत, निवडणुकीसाठी ८१ अर्ज दाखल करण्यात आले होते परंतु छाननीत २३ बाद झाल्याने ५८ उमेदवार शिल्लक राहिले परंतु अकरा तारखेच्या माघारीच्या दिवशी उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होईल . सध्या माकपा व भाजपा सर्व सतरा जागा लढवित असून राष्ट्रवादी काँग्रेस १२ जागा, शिवसेना ७ जागा, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ५ जागा लढवित आहे. तलासरी नगर पंचायतीची मतदार संख्या ९४३० आहे तसेच नगर पंचायतीच्या सतरा वॉर्डात चौरंगी लढत होत असून खरी लढत माकपा व भाजपातच होणार असून तलासरी नगर पंचयातीवर या दोघांपैकी एकाची सत्ता येणार असली तरी सध्या तरी माकपाची ताकत मागच्या ग्रामपंचायतीतील संख्याबळावरून जास्त असल्याचे दिसून येते.

Web Title: Multicultural battles everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.