शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ब्लॅक मॅजिकच्या नादात आईनेच केली पोटच्या मुलीची हत्या, मुलीच्या छातीवर उभे राहून केले नृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 16:45 IST

महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा अस्तित्वात आहे पण आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये लपूनछपून अंधश्रद्धेच्या नावाखाली विधी केले जातात.

ठळक मुद्देकाळया जादूचे अघोरी विधी करताना सानियाच्या छातीवर उभे राहून तिच्या आईने नृत्य केले मीनाक्षीने संपूर्ण शरीराला हळदीचा लेप लावलेला होता असे शेजारी राहणा-या गोसिया सलमानीने पोलिसांनी सांगितले. 

मुंबई - महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा अस्तित्वात आहे पण आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये लपूनछपून अंधश्रद्धेच्या नावाखाली विधी केले जातात. त्यामध्ये कुणाचा तरी बळी जातो. मुंबईपासूनच जवळच असलेल्या विरारमध्ये काळया जादूमुळे एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले. सानिया बेकरे असे मृत मुलीचे नाव आहे. सानिया ब-याच दिवसांपासून बद्धकोष्ठाच्या आजाराने त्रस्त होती. 

खरंतर सानियाला वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती. पण सानियाच्या आईने आणि काकीने आजारपणातून मुलीची सुटका करण्यासाठी  काळया जादूच्या नावाखाली अघोरी विधी करुन मुलीचा बळी घेतला. श्वास गुदमरल्यामुळे आणि गुप्तांगावरील जखमांमुळे सानियाचा मृत्यू झाल्याचे जे.जे. रुग्णालयातील शवविच्छेन अहवालात म्हटले आहे. बेकरे कुटुंब विरार पूर्वेला मनवेलपाडा येथे आई जीवदानी प्रसन्न  इमारतीमध्ये रहाते.

शनिवारी रात्री दहाच्या सुमारास सानियाचा मृत्यू झाला. रविवार दुपारपर्यंत तिचा मृतदेह घरातच होता. सानियाचे काका संजय मोरे तिला संजीवनी रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी सानियाला मृत घोषित केले. विरार पोलिसांनी मुलीची आई मीनाक्षी, वडिल अंबाजी आणि काकी माधुरी शिंदे यांना अटक केली आहे. पोलिसांनी सानियाच्या पालकांवर हत्येच्या 302 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.  

पोलिसांना सानियाच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या. काळया जादूचे अघोरी विधी करताना सानियाच्या छातीवर उभे राहून तिच्या आईने नृत्य केले त्याचवेळी काकीने तिचे पाय पकडले होते. 14 डिसेंबरला बेकरे यांच्या घरातून किंकाळण्याचे आवाज येते होते असे शेजा-यांनी पोलिसांना सांगितले. मीनाक्षीने संपूर्ण शरीराला हळदीचा लेप लावलेला होता असे शेजारी राहणा-या गोसिया सलमानीने पोलिसांनी सांगितले. 

मीनाक्षी घरामध्ये काळी जादू करायची असे इमारतीत राहणा-या रहिवाशांनी पोलिसांना सांगितले. आपल्या बहिणीला आजारपणातून बरे करण्यासाठी आई आणि काकीने तिच्यावर काही विधि केले असे सानियाचा भाऊ यशने पोलिसांना सांगितले. तो 14 वर्षांचा आहे. हे सर्व घडत असताना आपले वडिल घरात हजर होते. पण त्यांनी कुठलाही हस्तक्षेप केला नाही असे यश म्हणाला.  

टॅग्स :Crimeगुन्हा