शहरं
Join us  
Trending Stories
1
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
2
अपघातग्रस्ताला 1.5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
3
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
4
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
5
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होऊ शकते वाढ; काय म्हटलंय नव्या रिपोर्टमध्ये
6
Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
7
काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न
8
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
9
"CM फडणवीसांनी शेजारच्या खुर्च्यांवर कोण बसलंय ते बघावं"; भीती संगम म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
11
"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
12
WPL 2026 Opening Ceremony : हरमनप्रीत अन् स्मृती मैदानात उतरण्याआधी या बॉलिवूडकरांचा दिसणार जलवा
13
'लाडक्या बहिणीं'साठी स्टार प्रचारकही मैदानात, महिला मतांचा कौल ठरणार निर्णायक
14
पगारवाढ हवी असेल तर ऑफिसला यावंच लागेल; TCS चा कडक पवित्रा, 'WFO' अटेंडन्स पूर्ण नसल्यास अप्रेझल रखडणार
15
Social Viral: कोण म्हणतं पाणीपुरी विकणं छोटं काम आहे? तापसीने करून दाखवलं 'वर्ल्ड रेकॉर्ड'
16
'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका
17
२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख
18
Nashik Municipal Election 2026 : सभांचा धडाका; ठाकरे बंधू आज; उद्या शिंदे, रविवारी मुख्यमंत्री; फोडाफोडीचा मुद्दा गाजणार
19
जगात 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त चांदी; भारतापेक्षा तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त...!
20
बापानं किडनी देऊन वाचवलं, कर्जाचा डोंगर उपसून उपचार केले; पण त्याच मुलानं आयुष्य संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

आई, मुलाला बंधक बनवून चाकूच्या धाकाने दिवसाढवळ्या लुटले; वसईच्या सातिवली येथील रिलायबल ग्लोरी इमारतीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 19:34 IST

मंगेश कराळे लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसई पुर्वेकडील सातिवली विभागातील रिलायबल ग्लोरी या इमारतीतील एका घरात दुपारच्या दीड वाजण्याच्या ...

मंगेश कराळे

लोकमत न्यूज नेटवर्क,

नालासोपारा : वसई पुर्वेकडील सातिवली विभागातील रिलायबल ग्लोरी या इमारतीतील एका घरात दुपारच्या दीड वाजण्याच्या सुमारास आलेल्या तीन आरोपींनी आई व मुलाला चाकूच्या धाकाने चिकटपट्टीने तोंड, हात पाय बांधून लुटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दिवसाढवळ्या घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर वालीव पोलिसांच्यावर कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सातिवली येथील रिलायबल ग्लोरी इमारतीच्या ए विंग मधील ३०१ सदनिकेत संजिता राऊत नावाची महिला परिवारासह राहतात. या इमारतीत राहणारे राजेश सिंग यांनी दिलेली माहितीनुसार मंगळवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास १८ ते ३० वयोगटातील आरोपी हातात चाकू घेऊन त्यांच्या घराची बेल वाजवली. त्यांनी दरवाजा उघडताच चाकूच्या धाकाने घरात घुसले. संजिता आणि त्यांच्या मुलाच्या तोंडाला, हातापायाला चिकटपट्टी लावून बंधक बनवले. त्यानंतर आरोपींनी घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा ऐवज लुटून पळून गेले. आरोपी पळाल्यावर घरातील लोकांनी खिडकीत येऊन आरडाओरड केल्यावर इमारतीमधील लोक जमा झाले. त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती वालीव पोलिसांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी हेच आरोपी इमारतीत आल्याची माहिती येथील राहणाऱ्या रहिवाशांनी दिली आहे. तेच आरोपी असतील अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. सदर महिलेच्या गळ्याला चाकू लागल्याने जखमी झाली असून तिच्याकडून विरोध केला असल्याचे कळते.

दुपारच्या सुमारास तीन आरोपींनी चाकूच्या धाकाने घरात घुसून चिकटपट्टीने बांधून कपाटाची चावी घेऊन मुद्देमाल चोरून नेला आहे. आरोपींना पकडण्यासाठी तीन ते चार टीम तयार केल्या आहेत. गुन्हे शाखेच्या टीमही आरोपींच्या मागावर आहे. लवकरच आरोपी पकडून गुन्ह्याची उकल करणार.- पौर्णिमा चौगुले - श्रींगी, (पोलिस उपायुक्त)

English
हिंदी सारांश
Web Title : Vasai: Mother, child held hostage, robbed at knifepoint in daylight.

Web Summary : In Vasai, three robbers held a mother and child hostage at knifepoint, taping their mouths and limbs. They stole gold jewelry, cash, and mobile phones from their flat in Reliable Glory building. Police are investigating, with multiple teams searching for the suspects.
टॅग्स :Robberyचोरी