शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू वसई-विरारमध्ये; महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 01:30 IST

जिल्ह्याचा ग्रामीण भाग कोरोनामुक्तीकडे

- जगदीश भोवडपालघर : पालघर जिल्ह्यातील एकमेव वसई-विरार महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यू झालेल्यांचीही संख्या सर्वाधिक ठरली आहे. वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये आजवर २९ हजार ८५० रुग्ण बाधित झालेले असून मृत्यू झालेल्यांची संख्या ८९५ आहे. वसई-विरारनंतर पालघर तालुक्यामध्ये सर्वाधिक ८ हजार २६८ रुग्ण आढळले आहेत, तर १५० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.पालघर जिल्ह्यामध्ये आजवर ४५ हजार ३३४ रुग्ण आढळलेले असून यापैकी ४३ हजार ८४२ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. मात्र त्याच वेळी जिल्ह्यात १ हजार १९९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात वसई-विरारमधील ८९५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आजवर २ हजार १८८ रुग्ण आढळलेले असून ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. जव्हारमध्ये ६१५ रुग्ण आढळले असून ६ जण मृत्यू पावले आहेत. मोखाडा तालुक्यात २८७ जण बाधित ठरले, तर ५ जण मृत्यू पावले. तलासरी तालुक्यामध्ये २६५ बाधित ठरले, तर ४ जणांचा मृत्यू झाला. वसईच्या ग्रामीण भागात १ हजार ३६६ जण कोरोनाने बाधित ठरले, तर ४९ जणांना प्राण गमवावे लागले. विक्रमगड तालुक्यामध्ये ५९८ जण बाधित ठरले, तर ८ जण मृत्यू पावले. वाडा तालुक्यामध्ये १ हजार ८७२ लोक बाधित ठरले, तर ४३ जणांना आपले प्राण गमवावे लागले.वसई-विरारमध्येही कोरोना नियंत्रणातपालघर जिल्ह्यामध्ये वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले असले तरी आता मात्र आरोग्य यंत्रणेने बजावलेल्या चांगल्या भूमिकेमुळे पालिका क्षेत्रात कोरोना नियंत्रणात आला आहे. वसई-विरारमध्ये आजवर २९ हजार ८५० रुग्ण आढळले, तर ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्या वसई-विरार शहरांतील विविध रुग्णालयांमध्ये केवळ १७८ रुग्ण उपचार घेत आहेत.चार तालुक्यांत मृत्यूचे प्रमाण कमीपालघर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण दहापेक्षा कमी आहे. यामध्ये जव्हारमध्ये ६, मोखाडामध्ये ५, तलासरीमध्ये ४ तर विक्रमगडमध्ये ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले. अन्य तालुक्यांपैकी डहाणूमध्ये ३९, वसई ग्रामीण ४९, तर पालघरमध्ये १५० जण मृत्यू पावले आहेत. मात्र आता संपूर्ण जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे आरोग्य खात्याने दिलेल्या अहवालात दिसून येत आहे.तालुकानिहाय मृत्यूडहाणू     ३९जव्हार     ०६मोखाडा     ०५पालघर     १५०तलासरी     ०४वसई-विरार     ८९५वसई ग्रामीण     ४९विक्रमगड     ०८वाडा     ४३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या