पारोळ-भिवंडी मार्गावरील मोऱ्या खचल्या

By Admin | Updated: October 22, 2015 00:06 IST2015-10-22T00:06:59+5:302015-10-22T00:06:59+5:30

भिवंडीला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे पारोळ-भिवंडी रस्ता. अंबाडीमार्गे भिवंडीला जायचे तर वसई पूर्वेकडील नागरिकांना तो लांब पल्ल्याचा तसेच जास्त खर्चाचा

Mora on Parola-Bhiwandi route is empty | पारोळ-भिवंडी मार्गावरील मोऱ्या खचल्या

पारोळ-भिवंडी मार्गावरील मोऱ्या खचल्या

पारोळ : भिवंडीला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे पारोळ-भिवंडी रस्ता. अंबाडीमार्गे भिवंडीला जायचे तर वसई पूर्वेकडील नागरिकांना तो लांब पल्ल्याचा तसेच जास्त खर्चाचा मार्ग आहे. त्यामुळे येथील नागरिक भिवंडीला जाण्यासाठी पारोळ मार्गाचा वापर करतात. मात्र, मे महिन्यात बांधलेल्या मोऱ्या खचून हा मार्ग माजिवली येथे धोकादायक बनला आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग खराब झाल्याने मे महिन्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेकेदार पद्धतीने या मार्गाचे काम हाती घेण्यात आले. येथे अरुंद मोऱ्या होत्या, त्या प्रवासाच्या दृष्टीने मोठ्या बांधण्यात आल्या, पण ठेकेदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने सहा महिन्यांतच त्या मोऱ्या खचल्या.
रस्ता खचल्याने या मार्गाचा अंदाज न येऊन अनेकांचा येथे अपघात झाला, अनेकांचे बळीही गेले. पण, ठेकेदारांना याचे काही सोयरसुतक नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही मूग गिळून गप्प आहेत. (वार्ताहर)

Web Title: Mora on Parola-Bhiwandi route is empty