विनयभंग करणा-यास जमावाकडून चोप, अटक
By Admin | Updated: January 13, 2015 01:32 IST2015-01-13T00:39:20+5:302015-01-13T01:32:53+5:30
एका नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या मोहमंद हदीस मोहंमद इस्लाम राईन (२४) याला कापूरबावडी पोलीसांनी अटक केली आहे.

विनयभंग करणा-यास जमावाकडून चोप, अटक
ठाणे : एका नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या मोहमंद हदीस मोहंमद इस्लाम राईन (२४) याला कापूरबावडी पोलीसांनी अटक केली आहे. हा घृणास्पद प्रकार करतांना नागरिकांनीच चोप देऊन त्याला पोलीसांच्या ताब्यात दिले.
पातलीपाडा मार्केट परिसरातील एका दुकानात केळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या हदीसने संकेत शाळेच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावरुन जाणाऱ्या या चिमुरडीचा विनयभंग करीत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी त्याला बेदम चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले. ही घटना ११ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. च्या सुमारास घडली. कापूरबावडी पोलीसांनी त्याला सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास अटक केली. त्याच्याविरुद्ध ‘पोस्का’ तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे न्यायालयाने त्याला १७ जानेवारीपर्यन्त पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक अमृता चवरे या याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)