विनयभंग पिडीतेच्या पतीची आत्महत्या?; झाडाला गळफास घेतलेला मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:02 IST2019-01-02T00:01:45+5:302019-01-02T00:02:13+5:30
मनोर जवळील सावळे पाडा कोणढान येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या तिच्या पतीचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

विनयभंग पिडीतेच्या पतीची आत्महत्या?; झाडाला गळफास घेतलेला मृतदेह आढळला
- आरिफ पटेल
मनोर : मनोर जवळील सावळे पाडा कोणढान येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या तिच्या पतीचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
मनोर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्या प्रकरणी उधऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल व पती चा आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावळे पाडा कोंढाणा येथे एका आदिवासी समाजाच्या महिलेवर तिच्या घरात घुसून उधºया सबळा हे १७ डिसेंबरला अतिप्रसंग करीत असतांना त्या वेळी तिचा पती गाव देवीचा कार्यक्र म आटोपून घरी आला. त्याच्यात व उधºयामध्ये हाणामारी झाली. त्या मध्ये त्याच्या पायाला इजा झाली पती अशोक शेलार त्या दिवसापासून गायब होता. त्या विषयी मनोर पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर ला मिसिंगची केस दाखल केली होती. पोलीस शोध घेत असतांना ३१ डिसेंबरला त्याचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला आहे. त्याचे पाय जमिनीला स्पर्श करत असल्यानेही आत्महत्या की खून असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.मनोर पोलीस ठाण्यात विनयभंग व आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनाचे रिपोर्ट आल्यावर पुढील तपास करण्यात येईल असे उपनिरिक्षक ढोले यांनी सांगितले. सध्या संपूर्ण तालुक्यात याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे.