थेंब-थेंब पाण्यासाठी मोखाडावासियांची तारेवरची कसरत
By Admin | Updated: May 12, 2017 14:02 IST2017-05-12T13:05:24+5:302017-05-12T14:02:18+5:30
ऑनलाइन लोकमत/ रविंद्र साळवे पालघर(मोखाड), दि. 12 - धामनशेत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पाटील पाडा ठाकूरवाडी धामनशेत या गावपाड्यांमध्ये भीषण ...

थेंब-थेंब पाण्यासाठी मोखाडावासियांची तारेवरची कसरत
ऑनलाइन लोकमत/ रविंद्र साळवे
पालघर(मोखाड), दि. 12 - धामनशेत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पाटील पाडा ठाकूरवाडी धामनशेत या गावपाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई असल्याने येथील स्थानिकांना तहान भागवण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे.
विहिरीत उतरुन घोटभर पाण्यासाठी तारेवरची कसरत करुन जिवाचा आटापिटा करत आदिवासींना पाण्याची तहान भागवावी लागत आहे. येथील गावपाड्यांची लोकसंख्या 1600 च्या आसपास आहे.
गेल्या काही महिन्यांपासून येथील विहिरींनीही तळ गाठल्याने येथे पाणीबाणी निर्माण झाली आहे. "लोकमत"च्या पाठपुराव्याने येथे एका टँकरने पाणी पुरवठा सुरू असून येथील गावपाड्यांची लोकसंख्या हजारांच्या संख्येने असल्याने पाटील पाडा आणि ठाकूरपाडा या पाडयांचे प्रस्ताव मंजूर करून दिवसातून टँकरच्या दोन ते तीन फेऱ्या कराव्यात, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
https://www.dailymotion.com/video/x844z4z