मोहनसिंगचा मारेकरी त्याचा छोटा भाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:03 IST2017-07-18T02:03:50+5:302017-07-18T02:03:50+5:30

जव्हार तालुक्यातील डहाणू - विक्रमगड बसस्टॉपच्या पिकअप शेडच्या पाठीमागील जंगलात मौजे कशीवली गावाच्या हद्दीत मृतावस्थेत आढळलेल्या मोहनसींग रानावतचा

Mohan Singh's assassin's younger brother | मोहनसिंगचा मारेकरी त्याचा छोटा भाऊ

मोहनसिंगचा मारेकरी त्याचा छोटा भाऊ

- लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : जव्हार तालुक्यातील डहाणू - विक्रमगड बसस्टॉपच्या पिकअप शेडच्या पाठीमागील जंगलात मौजे कशीवली गावाच्या हद्दीत मृतावस्थेत आढळलेल्या मोहनसींग रानावतचा मारेकरी त्याचा भाऊच असल्याने तपासात निष्पन्न झाले आहे. मयत मोहनसिंग हा मुळचा राजस्थान येथील उदयपूर जिल्ह्यातील घुमान गावचा रहिवासी असून, त्याचा छोटा भाऊ हिमंतसिंग रानावत वय २८ व त्याचा मित्र हरीसिंग चंदना यांनीच मोहनसींग म्हणजेच आरोपीचा मोठा भाऊ याचा कशीवली घाटात नेऊन खून केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींनी ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मोहनसिंग याला तुला दुकान सुरू करण्यासाठी सहा लाख रूपये देतो असे सांगून गावाहून बोलावून त्याला त्याच्याच एन्जॉय कारमध्ये त्याला दारू पाजून जव्हार डहाणू फाट्याजवळील बस स्टॉपच्या मागील बाजच्या जंगलात नेऊन एकाने त्याचे हात पकडले व दुसऱ्याने धारदार हत्याराने त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर वार करून त्याला ठार केले हिंमतसींग याला पोलीसांनी शनिवारी अटक केली असून दुसरा आरोपी हरीसिंग चदाना फरार आहे.

Web Title: Mohan Singh's assassin's younger brother