नैराश्यातून मॉडेलने जीवन संपवले

By Admin | Updated: September 30, 2014 01:01 IST2014-09-30T01:01:28+5:302014-09-30T01:01:28+5:30

वर्सोवा येथील म्हाडा कॉलनीत एका मॉडेलने नैराश्यातून आत्महत्या केली. अर्चना पांडे (26) असे मृत मॉडेलचे नाव आहे.

The model ended the life of depression | नैराश्यातून मॉडेलने जीवन संपवले

नैराश्यातून मॉडेलने जीवन संपवले

>मुंबई : वर्सोवा येथील म्हाडा कॉलनीत एका मॉडेलने नैराश्यातून आत्महत्या केली. अर्चना पांडे (26) असे मृत मॉडेलचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र आसिफ पठाण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, मात्र त्याला अटक केलेली नाही. 
मॉडेल अर्चना ही वर्सोवा येथील न्यू म्हाडा वसाहतीतील इमारत क्रमांक 6च्या बाराव्या मजल्यावर एकटी राहत होती. सोमवारी तिच्या फ्लॅटमधून दरुगधी येत असल्याची माहिती शेजा:यांनी पोलिसांना दिली. वर्सोवा पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यावर अर्चनाचा कुजलेला मृतदेह पंख्याला गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविला. तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती नैराश्याने ग्रासली होती तसेच तिची आर्थिक परिस्थिती खराब झाल्याचे तिने नमूद केले होते. याकरिता तिने आपला मित्रच कारणीभूत असल्याचे लिहिले होते. अर्चना सध्या मिङर प्रॉडक्शन या कंपनीत आर्थिक सल्लागार म्हणून काम करीत 
होती. तिने एका कॅलेंडरकरिता मॉडेलिंग केले होते तसेच  काही दक्षिणोच्या अल्बममध्येही काम केले होते. (प्रतिनिधी)    

Web Title: The model ended the life of depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.